नवी दिल्ली, 16 मार्च : भारतात डिजिटल पेमेंटद्वारे ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात सर्वात डिजिटल पेमेंट झाल्याची माहिती आहे. ऑनलाईन व्यवहारात जशी वाढ होत आहे, तितक्याच वेगाने फसवणूक, फ्रॉडची प्रकरणंही वेगाने वाढत आहेत. यूपीआय आयडी (UPI ID), गुगल पे (Google pay), पेटीएम (Paytm), क्यूआर कोडद्वारे (QR Code) अनेक पेमेंट केली जातात. परंतु हे करताना अतिशय सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमची एक चूक चांगलीच महागात पडू शकते आणि अकाउंट खाली होऊ शकतं.
अशी बाळगा सावधगिरी -
- ऑनलाईन पेमेंट करताना कोणी एखादं App डाउनलोड करण्यासाठी सांगितल्यास असं अजिबात करू नका. कोणतंही App डाउनलोड करू नका. फसवणूक करणाऱ्याने असे सांगितलेले App इन्स्टॉल झाल्यानंतर मोबाईल त्यांच्या कंट्रोलमध्ये जातो. त्यामुळे ही चूक टाळाच.
- पेमेंटवेळी मोबाईलवर एखादी लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितल्यास तसं करू नका. लिंकवर क्लिक करण्यास सांगणं हा फ्रॉडचा आणखी एक प्रकार आहे. जर OLX, Quickr सारख्या वेबसाईट्सवर कोणतं सामान विक्री करताना लिंकवर क्लिक करुन पेमेंट करणं टाळा. या साईट्सवर कोणीही अॅडव्हान्स पेमेंटची मागणी केल्यास, सतर्क व्हा.
- बँक अकाउंट, एटीएम (ATM), मोबाईल वॉलेट, यूपीआय पीन (UPI PIN), ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नका.
QR कोड फिशिंग -
ऑनलाईन फ्रॉड करणारे नेहमी विविध मार्गांचा फसवणूकीसाठी वापर करतात. त्यापैकी आता QR कोड फिशिंग हा प्रकार अधिकतर समोर येत आहे. ऑनलाईन पेमेंट करताना फ्रॉड करणारा एक क्यूआर कोड जनरेट करतो. त्यानंतर युजरला तो कोड स्कॅन करण्यासाठी सांगितलं जातं आणि स्कॅनिंगनंतर पैसे अकाउंटमधून कट होतात.
कसा कराल QR कोड फिशिंगपासून बचाव -
- QR कोड फोनच्या कॅमेरातून थेट स्कॅन करण्याऐवजी, अशा App द्वारे करा, ज्यात QR कोडचे डिटेल्स, जसं कोड पाठवणाऱ्याचं नाव असेल.
- मेसेज किंवा ईमेलवर आलेल्या कोणत्याही QR कोडला स्कॅन करू नका.
- बँकेत झालेल्या कोणत्याही ट्रान्झेक्शनवर त्वरित तक्रार करा. फ्रॉड झाल्यास त्याची तक्रार सायबर सेलकडे करा.
- केवळ दुकानांवर पेमेंट करताना क्यूआर कोड स्कॅन करावा लागू शकतो. परंतु कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवताना किंवा पैसे घेताना क्यूआर कोड स्कॅन करावा लागत नाही. त्यामुळे कोणी पेमेंटसाठी QR कोड स्कॅन करण्याची मागणी केल्यास, तसं करू नका.
काय आहे QR फिशिंग?
QR कोड ब्लॅक लाईन्सने बनलेला एक पॅटर्न कोड असतो, ज्यात युजरच्या अकाउंट संबंधीत सर्व माहिती असते. ज्यावेळी स्मार्टफोनमधून कोणताही कोड स्कॅन केला जातो, त्यावेळी त्यात सेव्ह डेटा डिजिटल भाषेत बदलला जातो. खऱ्या आणि खोट्या QR कोडमधला फरक समजणं कठीण ठरतं. सायबर फ्रॉडस्टर्स याचाच फायदा घेतात आणि QR कोड बदलतात. ज्यामुळे पैसे थेट फसवणूक करणाऱ्याच्या अकाउंटमध्ये जातात. यालाच QR फिशिंग असं म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online fraud, Online payments