मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /काय आहे मास्क्ड Aadhaar Card? असा होईल फायदा, पाहा डाउनलोड करण्याची सोपी प्रोसेस

काय आहे मास्क्ड Aadhaar Card? असा होईल फायदा, पाहा डाउनलोड करण्याची सोपी प्रोसेस

मास्क्ड आधार सामान्य आधार कार्ड प्रमाणेच आहे. परंतु यात केवळ एक फरक आहे, यात आधार नंबर काही अंशी लपलेला असतो.

मास्क्ड आधार सामान्य आधार कार्ड प्रमाणेच आहे. परंतु यात केवळ एक फरक आहे, यात आधार नंबर काही अंशी लपलेला असतो.

मास्क्ड आधार सामान्य आधार कार्ड प्रमाणेच आहे. परंतु यात केवळ एक फरक आहे, यात आधार नंबर काही अंशी लपलेला असतो.

नवी दिल्ली, 4 जानेवारी : भारतात Aadhaar Card सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्ड नसल्यास अनेक कामं अडकू शकतात. तसंच मास्क्ड आधार कार्डही महत्त्वाचं ठरतं. हे यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (UIDAI) जारी केलं जातं. हेदेखील एक रेग्युलर आधार प्रमाणेच ओळखपत्र आहे. परंतु हे सुरक्षेच्यादृष्टीने फायदेशीर ठरतं.

Google Payवर सोनं खरेदी-विक्रीची संधी, ऑनलाईन ट्रान्झेक्शनसाठी पाहा सोपी प्रोसेस

काय आहे मास्क्ड आधार कार्ड -

मास्क्ड आधार सामान्य आधार कार्ड प्रमाणेच आहे. परंतु यात केवळ एक फरक आहे, यात आधार नंबर काही अंशी लपलेला असतो. या मास्क्ड आधार कार्डमध्ये 12 अंकी आधार नंबरऐवजी केवळ शेवटचे 4 अंक दिसतात. पहिले 8 नंबर लपलेले असतात, यामुळे युजरच्या ओळखीची सुरक्षा होण्यास मदत होते.

मास्क्ड आधार कार्डचा महत्त्वाच फायदा म्हणजे तुमचं आधार कार्ड हरवलं, तरी इतर कोणताही दुसरा व्यक्ती तुमच्या आधारचा गैरवापर, दुरुपयोग करू शकत नाही. मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रोसेसही सोपी आहे.

मोबाईलचे लोकेशन सांगणारा IMEI नंबर म्हणजे काय? काय आहे त्याचं महत्त्व?

कसं डाउनलोड कराल मास्क्ड आधार कार्ड?

- सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

- त्यानंतर ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये My Aadhaar पर्यायात Aadhaar Card Download पर्याय निवडा.

- त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका.

- आता Masked Aadhaar पर्याय निवडा आणि कॅप्चा कोड वेरिफाय करा.

- ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये Send OTP वर क्लिक करा. OTP टाकल्यानंतर आधार किंवा ई-आधार डाउनलोड करा, जो मास्क्ड आहे.

आधार कार्डचा PDF पासवर्ड 8 शब्दांमध्ये असेल. तुमच्या नावाची पहिली चार अक्षरं आणि जन्मतारीख मिळून पासवर्ड तयार होतो. तुमचं नाव जर Pooja आणि जन्मतारीख 1993 असेल, तर तुमचा ई-आधार पासवर्ड POOJ1993 असेल. मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करणं फायद्याचं ठरू शकतं.

First published:

Tags: Aadhar card, M aadhar card, Tech news