मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मोबाईलचे लोकेशन सांगणारा IMEI नंबर म्हणजे काय? काय आहे त्याचं महत्त्व?

मोबाईलचे लोकेशन सांगणारा IMEI नंबर म्हणजे काय? काय आहे त्याचं महत्त्व?

मोबाईलची ओळख असणारा आयएमईआय हा विशेष प्रकारचा नंबर अत्यंत महत्त्वाचा असतो कारण त्यात अनेक प्रकारची माहिती लपलेली असते. मोबाईलचे मॉडेल (Model) कोणते आहे, त्याचे उत्पादन कुठं झालं आहे, इत्यादी माहिती या नंबरवरून कळू शकते.

मोबाईलची ओळख असणारा आयएमईआय हा विशेष प्रकारचा नंबर अत्यंत महत्त्वाचा असतो कारण त्यात अनेक प्रकारची माहिती लपलेली असते. मोबाईलचे मॉडेल (Model) कोणते आहे, त्याचे उत्पादन कुठं झालं आहे, इत्यादी माहिती या नंबरवरून कळू शकते.

मोबाईलची ओळख असणारा आयएमईआय हा विशेष प्रकारचा नंबर अत्यंत महत्त्वाचा असतो कारण त्यात अनेक प्रकारची माहिती लपलेली असते. मोबाईलचे मॉडेल (Model) कोणते आहे, त्याचे उत्पादन कुठं झालं आहे, इत्यादी माहिती या नंबरवरून कळू शकते.

  मुंबई, 4 जानेवारी : आजकाल एखाद्याचा मोबाईल किंवा स्मार्टफोन (Smartphone) हरवला किंवा चोरीला गेला तर फारशी भीती बाळगली जात नाही,कारण मोबाईलचे लोकेशन (Location) ट्रॅक करता येते आणि चोराला पकडलं जाऊ शकतं याची माहिती बहुतेक सर्वांना आहे. अनेकदा मोबाईलचा माग काढून गुन्हेगारांना पकडल्याच्या बातम्याही आपण वाचतो. मोबाईलचा माग कसा काढता येतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर आहे आयएमईआय नंबर (IMEI Number). आयएमईआय नंबर म्हणजेच इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर. या आधारे मोबाईलचा शोध सहजपणे घेता येतो. प्रत्येक मोबाईलमध्ये हा 15 अंकी आयएमईआय (IMEI) नंबर दिलेला असतो. हा नंबर म्हणजे त्या मोबाईलची ओळख असते. या नंबरचं नेमकं महत्त्व काय आहे, हे जाणून घेणं आवश्यक आहे. त्याबाबत 'टीव्ही9'नं सविस्तर वृत्त दिलं आहे.

  मोबाईलची ओळख असणारा आयएमईआय हा विशेष प्रकारचा नंबर अत्यंत महत्त्वाचा असतो कारण त्यात अनेक प्रकारची माहिती लपलेली असते. मोबाईलचे मॉडेल (Model) कोणते आहे, त्याचे उत्पादन कुठं झालं आहे, इत्यादी माहिती या नंबरवरून कळू शकते. त्याच्या सुरुवातीच्या 8 अंकांवरून हे मॉडेल कुठे बनवले गेले आहे ते कळते तर त्यानंतरच्या 6 अंकांमध्ये डिव्हाइसशी संबंधित माहिती लपलेली असते. शेवटचा अंक मोबाईलच्या सॉफ्टवेअरची आवृत्ती (Software Version) सांगतो. अशा प्रकारे हा 15 अंकी नंबर तयार केला जातो. प्रत्येक फोनसाठी हा नंबर वेगळा असतो. हा नंबर काही मोबाईल्सच्या बॅटरीवर (Battery) लिहिलेला असतो.

  छोट्या गॅरेजमधून सुरू झालेल्या 'Apple' ची मोठी झेप; 3 ट्रिलियन मार्केट व्हॅल्यू असलेली जगातील पहिली कंपनी

  या नंबरशिवाय फोन वापरणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो. असा फोन कोणी वापरत असल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाईदेखील केली जाऊ शकते. हा नंबर मोबाईलचे लोकेशन सांगतो. याच्या मदतीने युजर मोबाईल कुठे वापरत आहे हे कळू शकते. फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास या नंबरच्या मदतीने फोन ट्रेस केला जातो.

  प्रत्येकाला आपल्या मोबाईलचा आयएमईआय नंबर माहीत असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या फोनचा आयएमईआय नंबर माहीत नसेल तर अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही तो जाणून घेऊ शकता. यासाठी तुमच्या फोनवरून *#06# असा नंबर डायल करा. हा नंबर डायल केल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर एक 15 अंकी नंबर दिसेल. हा आहे तुमच्या फोनचा आयएमईआय नंबर. तो लिहून ठेवून तुम्ही तो कायमस्वरूपी जतन करू शकता. नवीन फोन घेतल्यास नवीन फोनचा नंबरदेखील याच पद्धतीनं माहिती करून घेणं आवश्यक आहे.

  OLX, ऑनलाइन शॉपिंग साइटवर UPI Payment करताना Alert, या फ्रॉड ट्रिक्सपासून सावधान

  तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हा नंबर सुरक्षित ठेवू शकता. फोनच्या सेटिंग्जवरूनही तुम्ही हा नंबर जाणून घेऊ शकता. तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर त्याच्या सेटिंग्जमध्ये जा. नंतर About हा पर्याय निवडा आणि त्यानंतर आयएमईआय निवडा. स्टेटसवर टॅप करा आणि नंबर बघण्यासाठी स्क्रीन स्क्रोल करा. तुमच्याकडे iPhone 5 किंवा iPhone ची नवीन आवृत्ती असल्यास, आयएमईआय नंबर त्याच्या मागील पॅनेलवर प्रदर्शित होईल. फक्त फोन उलटा आणि तो कुठेतरी लिहून ठेवा. iPhone 4s आणि त्याहून जुन्या iPhonesमध्ये हा नंबर सिम ट्रेवर छापलेला असतो.

  तेव्हा आपला फोन कधी हरवला, चोरीला गेला तर तो परत मिळवण्यासाठी आपल्याकडे आयएमईआय नंबर असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही हा नंबर अद्याप जाणून घेतला नसेल तर वरील पद्धतीनं जाणून घ्या आणि त्याची नोंद करून ठेवा.

  First published:

  Tags: Smartphone, Tech news