नवी दिल्ली, 4 जानेवारी : ऑनलाईन ट्रान्झेक्शनसाठी Google Pay सह PhonePe, Paytm आणि इतर अनेक माध्यमं आहेत जिथे बिल पेमेंट, पैसे ट्रान्सफर आणि इतर कामं अगदी सोप्यारितीने करता येतात. आता Google Pay वर केवळ पैसे ट्रान्सफर करणंचं नाही, तर ऑनलाईन गोल्ड खरेदी आणि विक्रीही करता येईल. जर तुम्हाला ऑनलाईन सोनं खरेदी आणि विक्री करायची असेल तर यासाठी गुगल पे तुमची मदत करेल. Google Pay वर हे काम MMTC-PAMP च्या माध्यमातून सुरू झालं आहे. Google Pay ने स्वत: याबाबत आपल्या पेजवर माहिती दिली आहे.
गोल्ड लॉकरमध्ये दिसेल सोनं -
Google Pay ने दिलेल्या माहितीनुसार, याद्वारे ग्राहक आपल्या मोबाइल App द्वारे 99.99 टक्के शुद्ध 24 कॅरेट सोनं खरेदी करू शकतात. ग्राहकांना हे सोनं MMTC-PAMP कडून मिळेल. ग्राहकांचं सोनं MMTC-PAMP कडून चालवल्या जाणाऱ्या गोल्ड एक्युमुलेशन प्लॅन किंवा GAP मध्ये स्टोर ठेवलं जाईल. गुगल पेच्या गोल्ड लॉकरमध्ये हे खरेदी केलेलं सोनं दिसेल.
Google Pay वर कसं खरेदी कराल सोनं?
- Google Pay वर जा आणि New वर क्लिक करा.
- सर्च बारमध्ये Gold Locker टाइप करा आणि क्लिक करा.
- आता Buy वर क्लिक करा. इथे टॅक्ससह सध्याचा बाजारभाव दिसेल.
- जितकं सोनं खरेदी करायचं आहे, तितकी किंमत टाका.
- आता चेक मार्क चिन्हावर क्लिक करा.
- खाली आलेल्या विंडोमध्ये पेमेंट मेथेड सिलेक्ट करा आणि प्रोसीड टू पेवर क्लिक करा.
- पेमेंट झाल्यानंतर काही वेळात लॉकरमध्ये तुमचं सोनं दिसू लागेल.
Google Pay वर सोन्याची विक्री कशी कराल?
- Google Pay ओपन करा आणि New वर टॅप करा.
- सर्च बारमध्ये Gold Locker टाइप करुन क्लिक करा.
- आता Sell वर टॅप करा. सध्याचा सोन्याचा भाव दिसू लागेल.
- सोनं विक्री करताना टॅक्स लागत नाही. जितकं सोनं विकायचं आहे तितकं टाका.
- आता चेक मार्कवर क्लिक करा. सोनं विक्री झाल्यानंतर Google Pay अकाउंटमध्ये पैसे दिसू लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.