मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook च्या नावात बदल झाल्याने युजर्सवर काय परिणाम होणार? Mark Zuckerberg यांनी दिली माहिती

Facebook च्या नावात बदल झाल्याने युजर्सवर काय परिणाम होणार? Mark Zuckerberg यांनी दिली माहिती

जगभरात प्रसिद्ध सोशल मीडिया App म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकचं नाव आता बदलण्यात आलं असून त्याचं नाव मेटा (facebook name change as Meta) असं ठेवण्यात आलं आहे.

जगभरात प्रसिद्ध सोशल मीडिया App म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकचं नाव आता बदलण्यात आलं असून त्याचं नाव मेटा (facebook name change as Meta) असं ठेवण्यात आलं आहे.

जगभरात प्रसिद्ध सोशल मीडिया App म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकचं नाव आता बदलण्यात आलं असून त्याचं नाव मेटा (facebook name change as Meta) असं ठेवण्यात आलं आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : जगभरात प्रसिद्ध सोशल मीडिया App म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकचं नाव आता बदलण्यात आलं आहे. फेसबुकचं नाव मेटा (facebook name change as Meta) असं ठेवण्यात आलं आहे. सोशल मीडिया कंपनी फेसबुकच्या या नव्या नावाची घोषणा कंपनीचे CEO मार्क झुकरबर्ग (CEO Mark Zuckerberg) यांनी केली आहे. त्यामुळे आता या नव्या नावासहित फेसबुकमध्ये काय बदल होणार, कोणतं तंत्रज्ञान वापरलं जाणार याविषयी अजून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

फेसबुकच्या नव्या नावाची घोषणा करताना CEO मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं, की आतापर्यंत फेसबुकला सोशल मीडिया कंपनी (facebook new name) म्हणून ओळखलं जात होतं. लोकांना जोडणं हा फेसबुकचा DNA होता. परंतु आता फेसबुकचं नाव बदलून आम्ही मेटावर्स (Metaverse) करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या घोषणेनंतर आता युजर्ससाठी या App मध्ये कोणते बदल होणार हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

तुमचं Facebook कोणी Login केलं का? असं तपासा

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या नावामुळे Facebook App मध्ये काहीही बदल होणार नाही. फेसबुक App आधीसारखंच असणार आहे. ऑपरेटिंग सिस्टममध्येही कोणताही बदल होणार नाही. गाइडलाइन्सही फेसबुकच्याच असणार आहे. त्याशिवाय WhatsApp आणि Instagram वरही याचा काहीही परिणाम होणार नाही. आम्ही कोणतंही App किंवा त्याचा ब्रँड बदलणार नाही असं मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे.

तुमचं Adhaar Card परवानगीशिवाय कुठे वापरलं जातंय का? एका मिनिटात असं तपासा

झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव का बदललं?

फेसबुक ही कंपनी फक्त सोशल मीडिया App म्हणून ओळखली जाऊ नये तर टेक्नोलॉजी कंपनीच्या रूपात फेसबुकला ओळखलं जावं, अशी माहिती मार्क झुकरबर्ग यांनी दिली. त्यामुळे आता मेटावर्सवर अधिकाधिक लोकांना जोडता येईल, त्याचबरोबर इतर काही प्रॉडक्ट्ची विक्रीही करता येईल आणि त्यातून नवीन टेक्नोलॉजीही विकसित करता येईल, असही ते म्हणाले.

हे Mobile App लगेच डिलीट करा नाहीतर...थेट Google ने दिला इशारा

क्रिप्टो आणि NFT चा ही समावेश मेटावर्स प्लॅटफॉर्मवर होणार

मेटावर्सच्या नव्या प्लॅटफॉर्मवर क्रिप्टो आणि NFT चा ही समावेश केला जाणार असल्याचं झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर या प्लॅटफॉर्मवर युजर्सच्या प्रायव्हसीलाही सुरक्षा दिली जाईल, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

First published:

Tags: Facebook, Social media, Social media app