नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : Aadhaar Card प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. हे महत्त्वाचं ओळखपत्र असून व्यक्तीच्या वेरिफिकेशनसाठी सर्वच सरकारी आणि अनेक खासगी कामांसाठी आधार कार्ड मागितलं जातं. सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. आधार कार्ड हरवलं किंवा आधारची माहिती लीक झाली, तर याचा चुकीच्या कामासाठीही उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत सतर्क राहण्याची गरज आहे. हरवलेल्या किंवा लीक झालेल्या आधारवरील माहितीचा चुकीचा वापर केला जात नाही ना, हे तपासता येऊ शकतं.
WhatsApp वर फोटो-व्हिडीओ कसे कराल Save? एका ट्रिकने स्वत:लाच पाठवता येतील मेसेज
तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर होतोय का, असं तपासा - - आधार कार्डसाठीची ही सुविधा UIDAI द्वारे दिली जाते. तुमच्या आधारचा चुकीचा वापर होतोय का? हे माहित करुन घेण्याची परवानगी UIDAI द्वारे दिली जाते. - सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर Aadhaar Services मध्ये आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री हा पर्याय निवडा. - त्यानंतर आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड टाकावा लागेल. - आता ड्रॉप-डाउन मेन्यूमध्ये जनरेट OTP पर्याय निवडा. - त्यानंतर तुमच्या फोनवर आलेला OTP टाकावा लागेल. OTP टाकल्यानंतर तुम्ही तुमची Aadhaar Authentication History पाहू शकता.
दिवाळीत Online Shopping करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवाच…
महत्त्वाची बाब म्हणजे, ज्यावेळी तुमचा फोन नंबर आधारशी लिंक असेल, त्याचवेळी ही प्रोसेस करू शकता. जर तुमचा फोन नंबर आधारशी लिंक नसेल आणि आधार कार्डचा चुकीचा वापर होत असल्याचा संशय असल्यास, तुम्ही UIDAI च्या हेल्पलाइन 1947 वर कॉल करुन तक्रार करू शकता. तसंच help@uidai.gov.in वरही संपर्क करू शकता.