• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • हे Mobile App लगेच डिलीट करा नाहीतर...थेट Google ने दिला इशारा

हे Mobile App लगेच डिलीट करा नाहीतर...थेट Google ने दिला इशारा

Google ने आपल्या Play Store वरुन 150 धोकादायक Apps बॅन केले आहेत. Play Store वर हे 150 SMS स्कॅम App UltimaSMS नावाच्या एका स्कॅमचा भाग होते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : Google ने आपल्या Play Store वरुन 150 धोकादायक Apps बॅन केले आहेत. Play Store वर हे 150 SMS स्कॅम App UltimaSMS नावाच्या एका स्कॅमचा भाग होते. यात Fake Apps द्वारे युजर्सला महागड्या प्रीमियम SMS सेवांसाठी साइन-अप करण्यासाठी सांगितलं जात होतं. यातून युजर्स पैसे कमावू शकतील असं सांगितलं जातं होतं. परंतु अखेरीस युजर्सला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत होता. हे धोकादायक Apps Google Play Store वरुन 10.5 मिलियनहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत. आता प्ले स्टोरवरुन असे 150 SMS स्कॅम Apps बॅन करण्यात आले आहेत. UltimaSMS या स्कॅमबाबत महत्त्वाची बाब म्हणजे हा कोणत्या एका देशापर्यंत सीमित नाही, तर सौदी अरब, पाकिस्तान, तुर्की, ओमान, कतार, कुवेत, अमेरिका, पोलंड मध्येही Android युजर्ससह जगभरातील अनेक देशांमध्ये हा SMS App स्कॅम पसरला आहे. एखाद्या युजरने हे Apps प्ले स्टोरवरुन डाउनलोड केलं, तर App त्यांचं लोकेशन, IMEI नंबर आणि फोन नंबरचा तपास करतो, जेणेकरुन याची माहिती घेता येईल की App डाउनलोड करणारा युजर कोणत्या देशाचा आहे, त्यानुसार त्याच्यासोबत कोणत्या कोडचा, भाषेचा वापर करता येईल. ज्यावेळी युजर App ओपन करतो, त्यावेळी त्याला त्याच्या स्थानिक भाषेत फोन नंबर टाकण्यासाठी फोनवर एक स्क्रिन सेट करुन दिली जाते. App कडून मागितलेले डिटेल्स भरल्यानंतर युजर प्रीमियम SMS सेवांचं सब्सक्रिप्शन घेतो. यात युजरला देश आणि मोबाइल कंपनीच्या आधारे प्रति महिना 40 डॉलरहून अधिक पैसे द्यावे लागू शकतात. युजरने एकदा पैसे भरल्यानंतर हे App काम पूर्णपणे बंद करतो. युजर्सला प्रीमियम SMS सब्सक्रिप्शनसाठी साइन-अप करायला सांगणं आणि त्यानंतर पैसे घेऊन त्यांची फसवणूक करणं, हाच या Apps चा उद्देश आहे. त्यामुळेच गुगलने हे धोकादायक Apps बॅन केले आहेत.

  दिवाळीत Online Shopping करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवाच...

  Google ने बॅन केले हे Apps - All Language Photo and Voice Translator AI Chat Translator Pro for WhatsApp Ludo Masterpiece Online Ultra Camera HD Ano caller: Spam List & Caller ID Future Scanner FREE 2021 Ultima Keyboard 3D Pro VideoMixer Editor Pro FX Animate Editor Pro WhoCall Caller ID and Spam Blocker Pulse Rate Checker Battery Animation Charge 2021 Dynamic HD & 4K Wallpapers RGB Neon HD Keyboard Background LED Border Pure Tube PRO: Block Video Ads NOWDownloader and Private Apps Spam Calls Buster Future AI Scan Free 2021 AppLock X FREE Amazing Arab Videos NewVision Camera Qibla Finder: Qibla Compass & Prayer Times 2021 EasyCode: QR and Barcode Scanner Wi-Fi Opensignal Wallpaper XYZ Pro Video Saver & Private Browser Pixelize Art Muslim Memoji & Stickers for Whatsapp All HD Video SX - Smart Player Magic Mix Cut - Super Video Editor Wi-Fi Password Unlock Wi-Fi Around: All Wi-Fi and Hotspots Unlock Colorful Call Screen & Phone Flash Waterdrinker Reminder GT Sports Racing Online Magic Fonts and Keyboard 2021 Easy Smart Translator Pro Free Launcher X Pro Stay Fit: Home Fitness Plan Easy Chat Translator: All Language SecVPN: Fast and Secure VPN Pro Calls Recorder Projector HD/AR Video Editor LivePhoto Animator Reface Ultra Amore Live Random Chat Smart Global Translator AmazeTranslate PhotoLab Pro + Pro Video Downloader 2021 Fitness Ultimate 2021 Crime City: Revenge Football Masters 2021 New Body Shape Editor Mobile Scanner Pro: PDF Scanner App, Scan to PDF Call Voice Recording 2।0 Pro Tuber Ad Blocker for Video ICall U - Online Video Hotchat Wallpaper Anime for Android Roll Your Icons CosmosVPN Game Center: Complete Edition Easy Chat Translator for WhatsApp iOS Launcher X 2021
  Published by:Karishma
  First published: