• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • नवा फोन खरेदी करायचाय पण कोणता या गोंधळात आहात? अशी सुटेल तुमची समस्या

नवा फोन खरेदी करायचाय पण कोणता या गोंधळात आहात? अशी सुटेल तुमची समस्या

तुम्ही नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कोणता फोन घ्यावा कोणता नाही, अशी गोंधळाची स्थिती निर्माण होते. परंतु काही सोप्या टिप्स नवा स्मार्टफोन खरेदी करताना तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जुलै : बाजारात दररोज नवे स्मार्टफोन (Smartphone) लाँच होत असतात. अशात तुम्ही नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कोणता फोन घ्यावा कोणता नाही, अशी गोंधळाची स्थिती निर्माण होते. परंतु काही सोप्या टिप्स नवा स्मार्टफोन खरेदी करताना तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील. या गोष्टी लक्षात ठेऊन स्मार्टफोन खरेदी केल्यास, नुकसान टाळण्यासह गोंधळाची स्थितीही कमी होण्यास मदत होईल. बजेट - नवा स्मार्टफोन खरेदी करताना सर्वात आधी बजेट महत्त्वाचं ठरतं. बजेटनुसार, त्याच रेंजमध्ये चांगले पर्याय तपासू शकता. बजेट ठरल्यानंतर स्मार्टफोनची निवड करणं सोपं जातं. बजेट आणि फीचरनुसार नवा फोन घेणं सोपं ठरेल. प्रोसेसर - स्मार्टफोनच्या बेस्ट परफॉर्मेन्ससाठी प्रोसेसर (Smartphone Processor) महत्त्वाची भूमिका बजावतो. स्मार्टफोन घेताना त्यात कोणता प्रोसेसर देण्यात आला आहे, हे तपासा. स्नॅपड्रॅगन 730 जी पासून स्नॅपड्रॅगन 888 पर्यंतचे प्रोसेसर असणारे स्मार्टफोन खरेदी करण्याचा शक्यतो प्रयत्न करा. चांगल्या परफॉर्मेन्ससह चांगला गेमिंग अनुभवही यामुळे मिळेल. बॅटरी - कोरोना, लॉकडाउन या काळात स्मार्टफोनचा वापर अधिकच वाढला आहे. जवळपास संपूर्ण दिवसच कामासाठी किंवा इतर कारणांनी अनेक जण आपला वेळ मोबाईलवर घालवतात. वर्क फ्रॉम होममुळे हे प्रमाण अधिक वाढलं आहे. त्यामुळे सतत मोबाईल वापरताना त्याची बॅटरी (Battery) क्षमता तपासणं गरजेचं आहे. बॅटरी अधिक काळ चालण्यासह त्याच्या फास्ट चार्जिंग सपोर्टबाबतची तपासणी करा.

  (वाचा - WhatsApp युजर्सचा चॅट बॅकअप चोरी करू शकतात हॅकर्स, या फीचरने करा सिक्योर)

  कॅमेरा - युजर्समध्ये स्मार्टफोनमधून फोटोग्राफी (Photo Camera) करण्याचा ट्रेंड आहे, क्रेझ आहे. चांगल्या फोटो क्लिक करण्यासाठी प्रत्येक बजेट रेंजमध्ये कॅमेराचे अनेक पर्याय मिळतात. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे, फोटोग्राफीसाठी कॅमेराच्या मेगापिक्सलहून अधिक त्याचे फीचर्स महत्त्वपूर्ण ठरतात.

  (वाचा - स्मार्टफोनमधले खासगी फोटो, व्हिडिओ लपवायचे कसे? एका क्लिकवर करा माहिती)

  ऑपरेटिंग सिस्टम - नवा स्मार्टफोन खरेदी करताना त्याच्या केवळ लूककडेच लक्ष न देता, त्या फोनच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमकडेही (Operating System) लक्ष द्या. अँड्रॉईड फोन युजर्ससाठी लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अतिशय महत्त्वाचं आहे. यामुळे अनेक नवे अपडेट आणि फीचर्सची सुविधा मिळते.
  Published by:Karishma
  First published: