मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

स्मार्टफोनमधले खासगी फोटो, व्हिडिओ लपवायचे कसे? एका क्लिकवर करा माहिती

स्मार्टफोनमधले खासगी फोटो, व्हिडिओ लपवायचे कसे? एका क्लिकवर करा माहिती

Google Play Store वरुन कोणतंही App डाउनलोड करण्यापूर्वी ते चेक करा. कारण फेक अ‍ॅपही अगदी खऱ्या अ‍ॅप प्रमाणेच दिसतात. त्यामुळे Fake App तर डाउनलोड होत नाही ना याकडे लक्ष द्या. अ‍ॅप फेक असल्यास, त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा आयकॉनमध्ये गडबड दिसू शकते.

Google Play Store वरुन कोणतंही App डाउनलोड करण्यापूर्वी ते चेक करा. कारण फेक अ‍ॅपही अगदी खऱ्या अ‍ॅप प्रमाणेच दिसतात. त्यामुळे Fake App तर डाउनलोड होत नाही ना याकडे लक्ष द्या. अ‍ॅप फेक असल्यास, त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा आयकॉनमध्ये गडबड दिसू शकते.

आता आपण आधी हा डेटा हाइड कसा करायचा, हे पाहू या.

स्मार्टफोनमध्ये (Smart Phone) आपण अनेकदा खासगी किंवा गोपनीय फोटो, व्हिडिओ सेव्ह (Save) करून ठेवतो. हे फोटो, व्हिडिओ किंवा फाइल्स कोणी अन्य व्यक्तीनं पाहू नये, असं आपल्याला वाटतं. त्यामुळे ऑफिसमध्ये किंवा मित्र, घरी नातेवाईकांच्या हाती आपला फोन देताना आपल्या मनात एक प्रकारचं दडपण असतं; मात्र आपल्या स्मार्टफोनमध्ये काही ट्रिक्स असतात. त्यांचा वापर करून आपले खासगी फोटो, व्हिडिओ, तसंच महत्त्वाच्या फाइल्स फोन अन्य कोणत्याही व्यक्तीबरोबर शेअर केला, तरी त्या व्यक्तीला त्या पाहता येणार नाहीत. कारण त्या फाइल्स हाइड (Hide) होतील आणि तुमच्या मनावरचं दडपण नाहीसं होईल. खासगी डेटा (Personal Data) सुरक्षित ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रिक्सविषयीची माहिती 'झी न्यूज'ने दिली आहे.

आयफोन (iPhone) आणि अँड्रॉइड (Android) या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनमध्ये तुमचे खासगी फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स हाइड करता येऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीसोबत तुम्ही फोन शेअर केला आणि त्याने तुमचा अल्बम पाहिला तरी हा खासगी डेटा त्याला दिसत नाही. मग तुम्हाला प्रश्न पडेल, की हा खासगी डेटा हाइड केल्यावर तो सेव्ह राहतो का, तो परत पाहता येतो का? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. तुमचा हा सर्व खासगी डेटा अगदी व्यवस्थितपणे सुरक्षित राहतो. आता आपण आधी हा डेटा हाइड कसा करायचा, हे पाहू या.

अँड्रॉइड युझर्स

- आपल्या स्मार्टफोनमधलं गुगल फोटोज हे अॅप ओपन करा.

- जो फोटो तुम्हाला हाइड करायचा आहे, तो सिलेक्ट करा.

- वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा.

- त्यानंतर ड्रॉपडाउन मेन्यू ओपन होईल. त्यामधल्या Move To Archive या ऑप्शनवर क्लिक करा.

- यानंतर तुमचे खासगी फोटो, व्हिडिओ अर्काइव्ह नावाच्या वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह राहतील. हे फोटोज तुम्ही गुगल फोटोज मेन्यूमध्ये जाऊनदेखील अॅक्सेस करू शकता; मात्र या फोल्डरमधला कंटेंट, फाइल्स तुम्ही अन्य कोणत्याही दुसऱ्या फीडमध्ये पाहू शकत नाही.

हे वाचा - अखेर दहावीचा निकाल लागला; कधी लागणार बारावीचा निकाल; जाणून घ्या

अॅपलचं खास फीचर

iOS युजर्सना अॅपल कंपनी यासाठी एक खास फीचर देते. या फीचरचा वापर केल्यास फोनची मेन गॅलरी किंवा अल्बममधून फोटो किंवा व्हिडिओ हाइड करता येतो. यासाठी खाली दिलेले टप्पे वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा.

- सर्वप्रथम तुम्ही तुमचा आयफोन (iPhone) किंवा आयपॅडमधलं (iPad) फोटो अॅप ओपन करा.

- जो अल्बम तुम्ही हाइड करू इच्छिता त्यावर टॅप करा.

- वरच्या बाजूला उजवीकडे दिलेल्या 'सिलेक्ट ऑप्शन' या पर्यायावर टॅप करा.

- त्यापैकी जे फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही हाइड करू इच्छिता ते निवडा.

- त्याच्या शेअर बटणावर टॅप करा.

- शेअर शीट या मेन्यूतील हाइड हा ऑप्शन निवडा. या पद्धतीने तुम्ही तुमचे खासगी फोटो, व्हिडिओ हाइड करून निश्चिंतपणे आपला फोन अन्य व्यक्तीच्या हातात देऊ शकता.

लपवलेले अर्थात हिडन फोटोज (Hidden Photos) आणि व्हिडिओज पुन्हा अॅक्सेस करण्यासाठी खाली स्क्रोल करून Other Albums या पर्यायावर जावं आणि हिडन या पर्यायावर टॅप (Tap) करावं. जे फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही हिडन केले आहेत, ते पुन्हा सेव्ह होतील. फोटोज अनहाइड करण्यासाठी शेअर बटणावर टॅप करून Unhide सिलेक्ट करावं. या पद्धतीने तुम्ही तुमचा खासगी डेटा अनहाइड करू शकता.

First published:

Tags: Smartphone