• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • WhatsApp युजर्सचा चॅट बॅकअप चोरी करू शकतात हॅकर्स, या फीचरने करा सिक्योर

WhatsApp युजर्सचा चॅट बॅकअप चोरी करू शकतात हॅकर्स, या फीचरने करा सिक्योर

रिपोर्ट्नुसार, व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या चॅट बॅकअपवर हॅकर्सची नजर आहे. हॅकर्स Chat Backup चोरी करू शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जुलै : सध्याच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) कम्युनिकेशनसाठीचं महत्त्वाचं अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचा कोट्यवधी लोक मोठ्या प्रमाणात वापर करतात. WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. अनेक युजर्स या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा बॅकअप (WhatsApp Chat Backup) घेतात. रिपोर्ट्नुसार, व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या चॅट बॅकअपवर हॅकर्सची नजर आहे. हॅकर्स Chat Backup चोरी करू शकतात. WhatsApp एंड-टू-एंडने सर्व चॅट एन्क्रिप्ट करतो. त्यामुळे हॅकर्स या मेसेजमध्ये हॅकिंग करू शकत नाही. व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व चॅट End-to-end Encryption ने सुरक्षित असतात. WhatsApp Chat मध्ये काही करता येत नसलं तरी बॅकअपच्या माध्यमातून हॅकिंगचा धोका ठरू शकतो. हॅकर्स चॅट बॅकअप मिळवून डेटा हॅक करू शकतात. WABetaInfo नुसार, बीटा युजर्सने आपल्या स्मार्टफोनवर WhatsApp चं वर्जन 2.21.15.5 डाउनलोड करा. यामुळे सुरक्षा मजबूत होईल. तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी तासनतास गप्पा मारतो? शोधा ही ट्रिक वापरून कसं कराल सिक्योर - WABetaInfo ब्लॉग साईटने दिलेल्या माहितीनुसार, युजर्सला एक पासवर्ड निवडावा लागेल, यामुळे भविष्यात WhatsApp Backup ला एन्क्रिप्ट करेल. प्रत्येकवेळी बॅकअप रिस्टोर करताना युजरला पासवर्ड टाकावा लागेल. पासवर्ड नसेल, तर चॅट हिस्ट्री रिस्टोर करू शकणार नाही. हा पासवर्ड खासगी असून हा WhatsApp, फेसबुक, गुगल किंवा Apple सोबत शेअर केला जात नाही. हा पासवर्ड एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप एन्क्रिप्शनलाही सपोर्ट करतो. हाय सिक्योरिटी असूनही कसे लीक होतात WhatsApp Chat, वाचा काय आहे कारण यात केवळ a आणि f दरम्यानची लोअरकेस अक्षरं आणि अंक असू शकतात. हा पासवर्ड हरवल्यास किंवा विसरल्यास WhatsApp त्याला पुन्हा मिळवण्यासाठी मदत करू शकत नसल्याचाही इशारा ब्लॉग साईटने दिला आहे.
  Published by:Karishma
  First published: