जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / VI युजर्ससाठी कंपनीकडून फ्रॉड अलर्ट; जाणून घ्या यापासून कसा कराल बचाव

VI युजर्ससाठी कंपनीकडून फ्रॉड अलर्ट; जाणून घ्या यापासून कसा कराल बचाव

VI युजर्ससाठी कंपनीकडून फ्रॉड अलर्ट; जाणून घ्या यापासून कसा कराल बचाव

टेलिकॉम कंपनी VI कडून युजर्सला ऑनलाईन फ्रॉडबाबत अलर्ट करण्यात आलं आहे. या स्कॅममध्ये फ्रॉड करणारे स्कॅमर्स Vodafone-Idea ग्राहकांची KYC अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राइमच्या (Cyber Crime) संख्येत मोठी वाढ झाली आहे. बँकांकडून, सरकारकडूनही याबाबत जनतेला इशारा देण्यात आला आहे. आता टेलिकॉम कंपनी वोडाफोन - आयडियाकडूनही (Vodafone Idea - VI) युजर्सला ऑनलाईन फ्रॉडबाबत अलर्ट करण्यात आलं आहे. या स्कॅममध्ये फ्रॉड करणारे स्कॅमर्स Vodafone-Idea ग्राहकांची KYC अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक करत आहेत. फ्रॉड कॉल किंवा SMS द्वारे ग्राहकांना या फसवणुकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याआधी Airtel, Jio नेही आपल्या ग्राहकांना फ्रॉडबाबत अलर्ट केलं होतं. आता वोडाफोन-आयडियाकडूनही आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्याचं सांगण्यात आलं आहे. फेक कॉल किंवा SMS द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. यात ग्राहकांना KYC अपडेट करण्यासाठी सांगितलं जातं. KYC अपडेट न केल्यास, SIM कार्ड ब्लॉक केलं जाईल, असं त्या मेसेजमध्ये सांगितलं जातं. KYC डिटेल्स अपडेट नसल्याने सिम कार्ड ब्लॉक केलं जाईल असं सांगितलं जातं. तुमच्याकडे Contactless क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे का? अशी बाळगा सावधगिरी ग्राहकांची माहिती अपडेट नसल्याच्या नावाखाली खासगी डिटेल्स मागितले जातात. ग्राहक देखील आपलं सिम कार्ड ब्लॉक होईल या भीतीने KYC Update करण्यासाठी फ्रॉडस्टर्सकडून मागितलेली खासगी माहिती देतात. अनेक युजर्स या स्कॅममध्ये अडकले असून अनेकांचं आर्थिक नुकसान झालं आहे. फ्रॉड करणारे Vodafone-Idea मधून बोलत असल्याचं सांगत खासगी माहिती मागतात. Jio Alert! चुकूनही शेअर करू नका तुमचे personal details, अन्यथा….कंपनीकडून जिओ युजर्सला सतर्कतेचा इशारा परंतु कोणीही कॉल करुन किंवा मेसेज करुन पर्सनल डिटेल्स मागितल्यास अशी माहिती कोणालाही देऊ नका. कोणत्याही टेलिकॉम कंपन्या किंवा बँका कधीही OTP, KYC, आधार नंबर, पॅन नंबर अशी खासगी माहिती फोन किंवा मेसेजद्वारे मागत नाहीत. त्यामुळे कोणीही फोन करुन, SMS करुन अशी विचारणा केल्यास त्याला उत्तर देऊ नका. Fraud करण्यासाठी सायबर क्रिमिनल्सकडून केला जातो या ट्रिकचा वापर, या गोष्टी जाणून घेतल्यास फसवणुकीपासून होईल बचाव तसंच ग्राहकांनी कधीही कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. यामुळे डेटा चोरी होण्याचा धोका निर्माण होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात