मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Fraud करण्यासाठी सायबर क्रिमिनल्सकडून केला जातो या ट्रिकचा वापर, या गोष्टी जाणून घेतल्यास फसवणुकीपासून होईल बचाव

Fraud करण्यासाठी सायबर क्रिमिनल्सकडून केला जातो या ट्रिकचा वापर, या गोष्टी जाणून घेतल्यास फसवणुकीपासून होईल बचाव

सायबर क्रिमिनल्स लोकांची फसवणूक करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. त्यामुळे सावध राहणं गरजेचं असून यामुळे सायबर क्रिमिनल्सच्या जाळ्यात अडकून फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.

सायबर क्रिमिनल्स लोकांची फसवणूक करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. त्यामुळे सावध राहणं गरजेचं असून यामुळे सायबर क्रिमिनल्सच्या जाळ्यात अडकून फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.

सायबर क्रिमिनल्स लोकांची फसवणूक करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. त्यामुळे सावध राहणं गरजेचं असून यामुळे सायबर क्रिमिनल्सच्या जाळ्यात अडकून फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.

नवी दिल्ली, 28 जुलै : सायबर क्रिमिनल्स (Cyber Criminals) लोकांची फसवणूक करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. बनावट ऑफर्सच्या जाळ्यात अडकून, तर कधी फेक लिंकच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे सावध राहणं गरजेचं असून, कशाप्रकारे फसवणूक होते, हे जाणून घेतल्यास सायबर क्रिमिनल्सच्या जाळ्यात अडकून फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.

WhatsApp कॉल -

एखाद्या अनोळखी नंबरवरुन WhatsApp व्हॉईस कॉल आल्यास सावध व्हा. फोन करणारा फसवणुकीच्या उद्देशाने कॉल करू शकतो. तसंच फसवणुकीनंतर तो तुमचा नंबर ब्लॉक करतो, त्यामुळे नंतर पुन्हा त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट होत नाही. व्हॉईस कॉल करणारा या ट्रिकद्वारे फसवणूक करू शकतो.

तसंच, सध्या कोरोनाच्या नावानेही फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. कोरोना व्हायरसशी संबंधीत लिंक पाठवली जाते आणि त्याद्वारे फसवणूक होते. त्यामुळे कोरोनाच्या नावाने आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. सध्याच्या या कठीण परिस्थितीचा फ्रॉडस्टर्सकडून फायदा घेतला जात आहे.

UPI -

यूनिफाईड पेमेंट इंटरफेसद्वारे कोणाकडूनही सहजपणे पैसे मागितले जातात. फ्रॉडस्टर्स व्यक्तीला डेबिट लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगतात, पिन टाकल्यानंतर खात्यातून पैसे कट होतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी डेबिट रिक्वेस्टला डिलीट करा, त्यावर क्लिक करू नये.

सुरक्षित आणि Strong Password साठी या गोष्टी लक्षात ठेवाच, हॅकिंगपासून होईल बचाव

QR कोड -

क्यूआर कोड अर्थात क्विक रिस्पॉन्स कोडद्वारे फ्रॉडस्टर्स ग्राहकांची लूट करत आहेत. मोबाईलवर क्यूआर कोड पाठवला जातो. समोरचा व्यक्ती क्यूआर कोड लिंकवर क्लिक करतो आणि त्याचवेळी फ्रॉडस्टर्स त्या व्यक्तीच्या मोबाईल फोनचा क्यूआर कोड स्कॅन करुन खात्यातून रक्कम काढली जाते.

तसंच कोणत्याही ऑफरच्या जाळ्यात अडकू नका. एखाद्या मोठ्या ब्रँडच्या नावानेही फसवणूक केली जाते. स्वस्त दरातील वस्तू किंवा ऑफर, सेलच्या नावाखाली येणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ईमेल, SMS, मेसेजमध्ये दिलेल्या अटॅचमेंटवर क्लिक करुन ते ओपन करू नका. अटॅचमेंट ओपन केल्यास सावधपणे पुढील गोष्टी करा.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Online fraud, Tech news