मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमच्याकडे Contactless क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे का? अशी बाळगा सावधगिरी, जाणून घ्या फायदे-तोटे

तुमच्याकडे Contactless क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे का? अशी बाळगा सावधगिरी, जाणून घ्या फायदे-तोटे

कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड किंवा कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड सध्या चर्चेत आहे. यामुळे कॉन्टॅक्टलेस पेमेंट केलं जातं, म्हणजेच मशीनमध्ये स्वॅप न करताच आणि Pin न टाकता पेमेंट केलं जातं.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड किंवा कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड (Contactless Credit-Debit Card) सध्या चर्चेत आहे. यामुळे कॉन्टॅक्टलेस पेमेंट (Contactless Payment) केलं जातं, म्हणजेच मशीनमध्ये स्वॅप न करताच आणि Pin न टाकता पेमेंट केलं जातं. अशा कॉन्टॅक्टलेस कार्डला Wifi इनेबल्ड कार्ड बोललं जातं. या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर Wifi सारखं चिन्ह असतं. त्यावरुन ते कॉन्टॅक्टलेस कार्ड असल्याचं ओळखता येतं. या कार्डचे काही फायदे आहेत, तसं नुकसानही आहे.

Wifi क्रेडिट किंवा डेबिट कार्ड म्हणजे हे Wifi द्वारे काम करतं, असं नाही. हे कार्ड NFC अर्थात नियर फिल्ड कम्युनिकेशन आणि RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीवर काम करतं. या कार्डमध्ये एक चिप असते, जी एका मेटलच्या पातळ ऐंटिनाशी जोडलेली असते. याच ऐंटिनाद्वारे पीओएस मशीनला (POS Machine) सिग्नल मिळतो. तसंच याच ऐंटिनाला पीओएस मशीनद्वारे रेडिओ फ्रिक्वेन्सी फिल्डद्वारे इलेक्ट्रिसिटी मिळते आणि ट्रान्झेक्शन होतं. या कार्डद्वारे POS मशीनद्वारे 5000 रुपयांचं ट्रान्झेक्शन केलं जातं. या कार्डची रेंज 4 सेंटीमीटरपर्यंत असून यातून एकावेळी एकच ट्रान्झेक्शन केलं जातं.

काय आहेत फायदे -

- पेमेंटसाठी वेळ लागत नाही. कार्ड स्वाइप न करताच पेमेंट होतं.

- आपलं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कोणालाही द्यायची गरज लागत नाही.

- याद्वारे झालेल्या खर्चाची डिजीटल लिस्ट तयार होते.

- 5 हजारांपर्यंतच्या ट्रान्झेक्शनसाठी Pin टाकण्याची गरज लागत नाही.

इंग्रजीच नाही,तर आता तुमच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card,जाणून घ्या प्रोसेस

कॉन्टॅक्टलेस कार्डमुळे असं होऊ शकतं नुकसान -

जर तुमच्या खिशात कॉन्टॅक्टलेस डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल, तर फ्रॉडस्टर्स पीओएस मशीन टच करुन पैसे काढू शकतात. यात केवळ पीओएस मशीनने टच करुन पेमेंट होत असल्याने कार्डद्वारे सहजपणे पेमेंट होऊ शकतं. या कार्डद्वारे पेमेंटची मर्यादा 2 हजार रुपये होती, त्यानंतर ती वाढवून 5 हजार रुपये करण्यात आली.

Gmail वर आलेला अनोळखी Email नेमका कोणी पाठवला? या ट्रिकने असं तपासा

कार्डचा वापर होत असताना सवाधगिरी बाळगणंही गरजेचं आहे. कॅशियर पेमेंटसाठी किती रक्कम टाकतो हे पाहणं आवश्यक आहे. खरेदीवेळी बिल घेणं फायद्याचं ठरतं. कोणत्याही दुकान किंवा हॉटेलमध्ये कार्डद्वारे पेमेंट करताना कार्ड समोरच्या व्यक्तीच्या, दुकानदाराच्या हातात देणं टाळा. तुमच्या समोरच कार्ड स्वाइप करा आणि ट्रान्झेक्शननंतर आलेला मेसेज तपासा.

First published:

Tags: Credit card, Online payments, Shopping debit card, Tech news