मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Jio Alert! चुकूनही शेअर करू नका तुमचे personal details, अन्यथा....कंपनीकडून जिओ युजर्सला सतर्कतेचा इशारा

Jio Alert! चुकूनही शेअर करू नका तुमचे personal details, अन्यथा....कंपनीकडून जिओ युजर्सला सतर्कतेचा इशारा

कोणत्याही फेक मेसेजपासून सावध राहण्याच्या सूचना रिलायन्स जिओ टीमकडून देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही फेक मेसेजपासून सावध राहण्याच्या सूचना रिलायन्स जिओ टीमकडून देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही फेक मेसेजपासून सावध राहण्याच्या सूचना रिलायन्स जिओ टीमकडून देण्यात आल्या आहेत.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 23 जुलै: कोरोना काळात ऑनलाईन व्यवहार, डिजीटल ट्रान्झेक्शन्समध्ये (Online-Digital Transaction) मोठी वाढ झाली. एकीकडे ऑनलाईन व्यवहार वाढत असताना, दुसरीकडे मात्र ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राईमच्या (Cyber Crime) प्रकरणातही मोठी वाढ झाली. सायबर क्रिमिनल्स विविध मार्गांनी युजर्सची फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकार समोर आले. त्यामुळे कोणत्याही ऑफर्सच्या जाळ्यात न अडकता, कोणत्याही कॉल, मेसेजवर विश्वास न ठेवता आपली खासगी माहिती कुठेही शेअर न करण्याचा सल्ला बँकांसह, अनेक टेलिकॉम कंपन्यांकडूनही देण्यात आला आहे. आता रिलायन्स जिओनेही (Reliance Jio) ऑनलाईन फसवणुकीबाबत युजर्सला अलर्ट केलं आहे. सध्या ओटीपी (OTP), केव्हायसीच्या (KYC) नावाने, फेक मेसेज, लिंकने (Fraud Link) झालेले अनेक फ्रॉड समोर आले आहेत. त्यामुळे कोणत्याही फेक मेसेजपासून सावध राहण्याच्या सूचना रिलायन्स जिओ टीमकडून देण्यात आल्या आहेत. अशा मेसेजपासून सावध राहा, ज्यात एखाद्या नंबरवर कॉल करुन किंवा एखादं अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी सांगून केव्हायसी किंवा आधार कार्डची माहिती अपडेट करण्यासाठी सांगितल्यास त्यापासून सावध राहा.

Pegasus spyware च्या चर्चांदरम्यान धडाधड डाउनलोड होऊ लागलं कोचिंग सेंटर App

जिओ कधीही कोणत्याही कामासाठी किंवा युजर्सची माहिती अपडेट करण्यासाठी कोणतीही लिंक पाठवत नाही किंवा थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी सांगत नाही. तसंच इतर पर्सनल डिटेल्स विचारत नाही. त्यामुळे जिओच्या नावाने Aadhaar card, KYC अपडेट करण्याबाबत कोणीही सांगितल्यास त्यावर विश्वास ठेवू नका.

SMS, WhatsApp,मिस्ड कॉलसह या पद्धतींनीही हॅक केला जातो मोबाईल फोन;अशी घ्या काळजी

अशा बनावट, फेक कॉल किंवा मेसेजेसपासून सतर्क राहा. फेक मेसेज, कॉलमुळे आर्थिक नुकसानासह, डेटा चोरी होण्याची शक्यताही असू शकते. त्यामुळे यापासून सुरक्षित राहण्याचा सल्ला जिओ टेलिकॉमकडून देण्यात आला आहे.
First published:

Tags: Cyber crime, Online fraud, Reliance Jio, Tech news

पुढील बातम्या