Home /News /technology /

50MP गिंबल कॅमेरासह Vivo X70 Pro+, X70 Pro भारतात लाँच, काय आहे किंमत

50MP गिंबल कॅमेरासह Vivo X70 Pro+, X70 Pro भारतात लाँच, काय आहे किंमत

Vivo X70 सीरिज भारतात लाँच करण्यात आली आहे. भारतात या सीरिजचे X70 Pro Plus आणि X70 Pro हे दोन फोन लाँच करण्यात आले आहेत.

  नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : Vivo X70 सीरिज भारतात लाँच करण्यात आली आहे. भारतात या सीरिजचे X70 Pro Plus आणि X70 Pro हे दोन फोन लाँच करण्यात आले आहेत. Vivo X70 सीरिजची विक्री भारतात 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. परंतु ग्राहक प्री-बुकिंग आज 30 सप्टेंबरपासून करू शकतील. या दोन्ही फोन्सला Zeiss T* लेन्स कोटिंगसह कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. Vivo X70 Pro च्या 8GB आणि 128GB वेरिएंटची किंमत 46,990 रुपये आहे. 8GB+256GB वेरिएंटची किंमत 49,990 रुपये आणि 12GB+256GB वेरिएंटची किंमत 52,990 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. X70 Pro Plus मॉडेलच्या 12GB+256GB वेरिएंटची किंमत 79,990 रुपये आहे. याची विक्री 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. Vivo X70 Pro Specifications - - 6.56 इंची फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. - MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर - 4,450mAh बॅटरी - 44W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट - Android 11 बेस्ड FunTouch Os कॅमेरा - फोटोग्राफीसाठी Vivo X70 Pro फोनला रियल 50 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. त्याशिवाय दोन 12 मेगापिक्सल कॅमेरा आणि एक 8 मेगापिक्सल पेरिस्कोप लेन्स देण्यात आली आहे. प्रायमरी कॅमेराला गिंबल स्टेबिलायजेशन देण्यात आलं आहे. सर्व कॅमेरात Zeiss T* कोटिंग आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

  Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन नाइट मोड कॅमेरासह लाँच, किती आहे किंमत

  Vivo X70 Pro Plus Specifications - - 6.78 इंची UHD+ AMOLED डिस्प्ले - स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर - 4500mAh बॅटरी - 55W फास्ट चार्जिंग सपोर्ट - Android 11 बेस्ड FunTouch Os

  Xiaomi 11 Lite NE 5G भारतात लाँच, सुपर लाइट फोनची काय आहे किंमत?

  कॅमेरा - X70 Pro Plus ला 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा गिंबल स्टेबिलायजेशनसह देण्यात आला आहे. शिवाय 48 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, 12 मेगापिक्सल पोर्टेट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल पेरिस्कोप कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा पेरिस्कोप कॅमेरा 5x ऑप्टिकल झूम ऑफर करतो. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Smartphone, Tech news, Vivo

  पुढील बातम्या