नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : Samsung ने आपल्या F सीरिजचा पहिला 5G स्मार्टफोन Samsung Galaxy F42 5G भारतात लाँच केला आहे. या फोनला Dolby Atoms सपोर्ट असून यामुळे युजर्स जबरदस्त आजावाचा अनुभव घेऊ शकतील. त्याशिवाय फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह नाइट मोड फीचरही देण्यात आलं आहे.
Samsung Galaxy F42 5G Specifications -
फोनला 6.6 इंची फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. फोन अँड्रॉईड बेस्ड UI 3.1वर काम करतो. या फोनला चांगल्या परफॉरर्मेन्ससाठी MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे, ज्याला मायक्रो SD कार्डने वाढवता येऊ शकतं. Samsung Galaxy F42 ला 5000mAh बॅटरी देण्यात आली असून, 15W फास्ट चार्जिंग सपोर्टही आहे. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरही आहे. फोनला 5G, 4G LTE, डुअल बँड Wifi, ब्लूटूथ, GPS आणि USB port Type C सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
कॅमेरा -
Samsung Galaxy F42 5G फोनला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. त्याशिवाय 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. याला नाइट मोड कॅमेरा फीचरही आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
किंमत -
Galaxy F42 दोन वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. तर 6GB रॅम आणि 128GB वेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. या फोनचा पहिला सेल 3 ऑक्टोबर रोजी असेल. Samsung Galaxy F42 5G कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदी करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Samsung, Samsung galaxy, Smartphone