मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Xiaomi 11 Lite NE 5G भारतात लाँच, सुपर लाइट फोनची काय आहे किंमत?

Xiaomi 11 Lite NE 5G भारतात लाँच, सुपर लाइट फोनची काय आहे किंमत?

Xiaomi ने 11 Lite NE 5G हा आपला नवीन प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Xiaomi ने 11 Lite NE 5G हा आपला नवीन प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Xiaomi ने 11 Lite NE 5G हा आपला नवीन प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होईल.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : Festival Season च्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये खरेदीचा कल वाढत आहे. वाहन, कपडे, दागिने, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कंप्यूटर अशा सर्वच क्षेत्रांत मागणी वाढत असल्याने उत्पादकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उत्पादनं दाखल करण्यावर भर दिला आहे. सणासुदीच्या काळात मोबाइल (Mobile) खरेदी वाढते, हे लक्षात घेऊन मोबाइल उत्पादक कंपन्यांनी आपले नवे फोन लाँच करण्यास सुरुवात केली आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीनेही (Xiaomi) 11 Lite NE 5G हा आपला नवीन प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन (Smartphone) भारतात (India) लाँच केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होईल.

5G स्नॅपड्रॅगन चिपसेट, ट्रिपल-लेन्स कॅमेरा आणि फास्ट रिफ्रेश रेटसह डिस्प्ले ही खास वैशिष्ट्यं असणारा हा फोन 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज, तसंच 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज अशा दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध असून, त्यांची किंमत 26,999 रुपये आणि 28,999 रुपये आहे.

Amazon वर 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होईल. शाओमी स्टोअर्समध्येही (Xiaomi Stores) हा फोन 2 तारखेपासून उपलब्ध असेल. 2 ते 7ऑक्टोबर या कालावधीत विशेष दिवाळी सवलत (Special Diwali Offer) मिळण्याची संधी असून, दोन हजार रुपयांची बँक ऑफरदेखील मिळू शकते. Tuscany Coral, Vinyl Black, Jazz Blue, Diamond Dazzle अशा चार आकर्षक रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.

108MP कॅमेरासह Xiaomi चा 5G फोन स्वस्तात खरेदीची संधी, पाहा काय आहे ऑफर

Xiaomi च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778 जी चिपसेट असून, ही चिप 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. हा प्रोसेसर 12 बँड 5 जी सपोर्ट देईल, असा दावा कंपनीने केला आहे. ट्रिपल कॅमेरा लेन्स सेटअप (Triple Camera Lens Setup) असलेल्या या फोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असून, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सेल टेलीमॅक्रो लेन्स आहे. यात 20 मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.

Oppo Reno 6 Pro, Oppo F19s आणि Enco Buds स्पेशल एडिशन लाँच, काय आहे किंमत

या स्मार्टफोनला कॉर्निंग गोरिला ग्लासची सुरक्षा असून 6.55-इंची एचडी रिझॉल्युशन AMOLED Display आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz पर्यंत जाऊ शकतो. डॉल्बी व्हिजन, HDR10+साठी हा फोन उत्तम आहे. अशा अनेक फीचर्ससह असलेल्या या स्मार्टफोनला फेस्टिव्ह सीजनमध्ये चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Smartphone, Xiaomi