मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Vivo V23 Pro 5G आणि Vivo V23 आज भारतात लाँच होणार, पाहा काय असेल किंमत आणि फीचर्स

Vivo V23 Pro 5G आणि Vivo V23 आज भारतात लाँच होणार, पाहा काय असेल किंमत आणि फीचर्स

Vivo आज भारतात आपली V23 सीरीज (Vivo V23 Series) लाँच करणार आहे. या सीरीजमध्ये दोन फोन वीवो V23 (Vivo V23) आणि वीवो V23 Pro 5G (Vivo V23 Pro 5G) लाँच होणार आहेत.

Vivo आज भारतात आपली V23 सीरीज (Vivo V23 Series) लाँच करणार आहे. या सीरीजमध्ये दोन फोन वीवो V23 (Vivo V23) आणि वीवो V23 Pro 5G (Vivo V23 Pro 5G) लाँच होणार आहेत.

Vivo आज भारतात आपली V23 सीरीज (Vivo V23 Series) लाँच करणार आहे. या सीरीजमध्ये दोन फोन वीवो V23 (Vivo V23) आणि वीवो V23 Pro 5G (Vivo V23 Pro 5G) लाँच होणार आहेत.

नवी दिल्ली, 5 जानेवारी : Vivo आज भारतात आपली V23 सीरीज (Vivo V23 Series) लाँच करणार आहे. या सीरीजमध्ये दोन फोन वीवो V23 (Vivo V23) आणि वीवो V23 Pro 5G (Vivo V23 Pro 5G) लाँच होणार आहेत. लाँचिंग आधीच फोनची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Vivo Smartphone ची किंमत 50 हजार रुपयांहून कमी असणार आहे.

लीक माहितीनुसार, Vivo V23 5G दोन स्टोरेज वेरिएंट 8GB+128GB आणि 12GB+256GB स्टोरेज वेरिएंटमध्ये येईल. याची किंमत 31,990 रुपये आणि 35,990 रुपये असू शकते. दुसरीकडे Vivo V23 Pro 5G च्या 8 GB रॅमची किंमत 41,990 रुपये आणि 12 GB रॅम वेरिएंटची कीमत 45,990 रुपये आहे.

Vivo V23 5G स्टारडस्ट ब्लॅक कलर आणि Vivo V23 Pro 5G सनशाइन गोल्ड कलर ऑप्शनमध्ये येईल.

काय आहे मास्क्ड Aadhaar Card? असा होईल फायदा, पाहा डाउनलोड करण्याची सोपी प्रोसेस

Vivo V23 Pro काय असतील फीचर्स?

V23 Pro च्या लीक फीचर्सनुसार, फोनला 50 मेगापिक्सल I-ऑटोफोकस डुअल फ्रंट कॅमेरा सेटअप आहे. फोनला तीन रियर कॅमेरे असतील. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर देण्यात येईल. तसंच 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल मायक्रो/डेप्थ कॅमेरा असेल.

नवा Smartphone घ्यायचाय? OnePlus 9RT यादिवशी होणार लाँच, पाहा फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंची 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले असेल. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळेल. डिव्हाइसवर फ्लोराइट एजी ग्लासचा वापर केला जाईल, ज्यामुळे यूवी किरण आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास बॅक पॅनल आपला रंग बदलू शकेल. फोनला 4300mAh बॅटरी दिली जाण्याची माहिती असून 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Vivo V23 चे काय असतील फीचर्स?

या स्मार्टफोनमध्येही डुअल फ्रंट कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा असू शकतो. अल्ट्रावाइड फ्रंट कॅमेरा 105 डिग्री फील्ड ऑफ व्यूसह येईल. त्याशिवाय फ्रंट कॅमेरा डुअल टू फ्लॅश ऑफर करेल. स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंशन 920 SoC सह येईल. फोन 8GB + 128GB, 12GB + 256GB वेरिएंटमध्ये उपलब्ध होईल.

First published:

Tags: Smartphone, Tech news, Vivo