नवी दिल्ली, 4 जानेवारी : स्मार्टफोनच्या (Smartphone) क्षेत्रातली वनप्लस (One Plus) दिग्गज चिनी कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपले दोन नवे प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. वनप्लस 9 आरटी (OnePlus 9RT) आणि वनप्लस बड्स झेड टू टीडब्ल्यूएस (OnePlus Buds Z2 TWS) 14 जानेवारी रोजी लाँच होणार आहेत. कंपनीनं आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची घोषणा केली आहे. वनप्लस इंडियानं आपल्या ट्विटर अकाउंटवर दोन वेगवेगळ्या ट्विटद्वारे मोर्स कोडमध्ये एन्क्रिप्ट केलेला एक टीझर शेअर करून हे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होत असल्याची माहिती दिली होती. वनप्लसच्या चाहत्यांमध्ये या फोन्सबाबत प्रचंड उत्सुकता असून, दाखल होण्यापूर्वीच त्यांची वैशिष्ट्यं चर्चेत आली आहेत.
OnePlus 9RT स्पेसिफिकेशन्स -
वनप्लस 9 आरटी (OnePlus 9RT) या फोनमध्ये 6.62 इंची OLED डिस्प्ले असून, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन HDR10+ सह येतो. स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर असणाऱ्या या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून, OIS आणि EIS सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा सोनी IMX766 कॅमेरा, 16-मेगापिक्सल वाइड-अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G सपोर्ट, वाय-फाय 6, आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट, एनएफसी सपोर्ट आहे.
OnePlus Buds Z2 TWS स्पेसिफिकेशन्स -
OnePlus Buds Z2 TWS मध्ये नॉइज कॅन्सलेशनची (Noise Cancelation) सुविधा असून, यामुळे 40dB पर्यंतचा अनावश्यक आवाज रद्द होतो. त्यासाठीचे बड्स पांढऱ्या आणि काळ्या रंगात असून, ते तीन मायक्रोफोन कॉन्फिगरेशनसह येतात. ते 94ms पर्यंत अल्ट्रा-लो लेटन्सी देतात. 4000 mAhची बॅटरी असून, चार्जिंग केसमध्ये 520mAh बॅटरी आहे. याचं बॅटरी लाइफ 38 तासांचं असून, एका चार्जवर 7 तास गेम खेळता येतात, तर 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 5 तास ऐकता येतं. हा फोन पाण्यात पडला तरी सुरक्षित राहू शकतो. त्यासाठी याला IP55 रेटिंग मिळालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: One plus 9, Smartphone, Tech news