• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह Vivo चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह Vivo चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

वीवो इंडिया स्टोरवर एचडीएफसी क्रेडिट किंवा डेबिट कार्डने Vivo V21e 5G हा फोन खरेदी केल्यास, ग्राहकांना यावर 2500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 जून: वीवोने (Vivo) भारतात आपला नवा स्मार्टफोन वीवो V21e 5G (Vivo V21e 5G) लाँच केला आहे. हा फोन बाजारात वनप्लस नॉर्ड CE 5G आणि iQOO Z3 5G सारख्या फोनला टक्कर देऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. वीवो V21e 5G ची खास बाब म्हणजे याचा 64 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर कॅमेरा. वीवोच्या या फोनची किंमत 24,990 रुपये असून फ्लिपकार्ट, अॅमेझॉन इंडिया प्लॅटफॉर्मवर 30 जूनपासून हा फोन उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर वीवो इंडिया स्टोरवर एचडीएफसी क्रेडिट किंवा डेबिट कार्डने हा फोन खरेदी केल्यास, ग्राहकांना यावर 2500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

  (वाचा - तुम्हाला माहिती आहे का? सतत हवासा वाटणारा स्मार्टफोन तुमचं लैंगिक सुख हिरावतोय)

  Vivo V21e 5G फीचर्स - - 6.44 इंची AMOLED डिस्प्ले - स्क्रीन रेजोलूशन 1080x2400 पिक्सल - Android 11 बेस्ड Funtouch OS 11.1 - MediaTek Dimensity 700 SoC प्रोसेसर - 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज - 4,000mAh बॅटरी - 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट

  (वाचा - Google वर ही गोष्ट सर्च करत असाल तर वेळीच व्हा सावध; महिलेची अडीच लाखाची फसवणूक)

  कॅमेरा -  Vivo V21e 5G मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. तर सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सल देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच हा फोन 0 ते 72 टक्के चार्ज होण्यासाठी केवळ 30 मिनिटांचा वेळ लागत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात Wifi, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी पोर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
  Published by:Karishma
  First published: