मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुम्हाला माहिती आहे का? सतत हवाहवासा वाटणारा तुमचा स्मार्टफोन तुमचं लैंगिक सुख हिरावून घेतोय

तुम्हाला माहिती आहे का? सतत हवाहवासा वाटणारा तुमचा स्मार्टफोन तुमचं लैंगिक सुख हिरावून घेतोय

कित्येक जण डोक्याशी फोन घेऊन झोपतात.

कित्येक जण डोक्याशी फोन घेऊन झोपतात.

स्मार्टफोनमधून निघणारे घातक रेडिएशन आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात आणि यामध्ये लैंगिक आरोग्याचा समावेश आहे.

मुंबई, 26 जून : स्मार्टफोन (smartphone) आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा भाग बनलेला आहे. कुठेही गेलो तरी स्मार्टफोन आपल्या सोबतच असतो. स्मार्टफोनशिवाय आपली कामंही होत नाहीत आणि त्याची इतकी सवय झाली आहे की आपण अगदी काही क्षणही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मात्र हा स्मार्टफोन आपल्या आरोग्याला घातक (Dengues for Health) ठरतो. मोबाईलमुळे आपले डोळे आणि एकंदर आरोग्यावर परिणाम (Effect on Eyes & Body ) होतोच. पण लैंगिक आरोग्यावरही परिणाम होतो आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

तुम्ही तुमचा स्मार्टफोन कुठे ठेवता याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. स्मार्टफोनमधून निघणारे घातक रेडिएशन आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात आणि यामध्ये लैंगिक आरोग्याचा समावेश आहे.  स्मार्टफोन जवळ ठेवण्याच्या काही चुकीच्या पद्धतीमुळे विशेषत: पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर वाईट परिणाम (Effect on Sexual Health) होतो.

(या सुकामेव्यात आहे कॅन्सरला दूर ठेवण्याचे गुण; आहेत अगणित फायदे)

स्मार्टफोन कुठे ठेवल्याने त्याचा कसा आणि काय परिणाम होतो ते पाहुयात.

पँटच्या दोन्ही बाजूच्या खिशात

शक्यतो आपण पँटच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या खिशात स्मार्टफन ठेवतो. पण पुरुषांनी पँटच्या पुढच्या पॉकेटमध्ये स्मार्टफोन कधीच ठेवू नये. यामुळे स्पर्म काऊंट आणि क्वॉलिटीवर परिणाम होतो. स्पर्म क्वालिटी खराब झाल्यामुळे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

पँटच्या मागच्या खिशात

पँटच्या मागच्या पॉकेटमध्ये स्मार्टफोन ठेवल्यामुळे आपल्या मज्जातंतूवर परिणाम होऊ शकतो. कमरेचा खालचा भाग आणि नितंबावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उठताना, बसताना वेदना होण्याचा त्रास होतो.

(स्ट्रेस फ्री जगायचंय? लवकर उठावं लागेल; ही 8 कारणं वाचाच)

याशिवाय मागच्या पॉकेटमध्ये स्मार्टफोन ठेवला तर, तो लवकर पडून तुटण्याची भीती असते.

शर्टच्या खिशात

बऱ्याच जणांना आपल्या शर्टच्या खिशामध्ये स्मार्टफोन ठेवायची सवय असते. मात्र मोबाईलमधून निघणारे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक रेडिएशन्समुळे हृदयावर वाईट परिणाम होतो. हाय ब्लड प्रेशर,डायबेटीज रुग्ण किंवा 40 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना शर्टच्या खिशामध्ये स्मार्टफोन ठेवण्याचं जास्त वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

उशीजवळ फोन

अनेकांना फोन बघत झोपायची सवय असते आणि झोपताना मोबाईल उशी जवळ ठेवतात. मात्र यामुळे आपल्या झोपेवर वाईट परिणाम होतात. शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक बिघडतं शिवाय आपल्याला शांत झोपही लागत नाही. झोपताना नेहमी बेडरूममध्ये शांतता आणि अंधार असायला हवा.

(झोपा नाहीतर मृत्यू येतोय! संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब)

स्मार्टफोन किंवा त्यासारख्या इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बेडरूममध्ये ठेवू नयेत किंवा बेडपासून दूर अंतरावर ठेवाव्यात.

फोन डोक्याजवळ ठेवून चार्जिंग नको

काहीजण झोपताना आपला डोक्याजवळ स्मार्टफोन ठेवून चार्जिंग करतात. हे अतिशय घातक आहे. चार्जिंग होताना फोनमधून घातक रेडिएशन्स बाहेर पडत असतात. ज्याचा मेंदू आणि त्वचेवर परिणाम होत असतो. त्यामुळे फोन दिवसा चार्जिंग करावा किंवा चार्जिंग करताना दूर ठेवावा.

कुठे ठेवावा फोन?

झोपण्याआधी एक ते दोन तास स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बंद करा. आपल्या खोलीमध्ये स्मार्टफोन ठेवण्याऐवजी दुसऱ्या रूममध्ये मोबाईल ठेवा. बेडरूममध्ये स्मार्टफोन ठेवावा लागणार असेल तर तो झोपण्याच्या जागेपासून दूरवर ठेवा. त्याच्या रेडिएशन्स त्रास होणार नाही.

First published:

Tags: Health, Lifestyle, Mobile Phone, Sexual health, Smartphone