Home /News /technology /

आता Youtube बनणार शॉपिंग हब; व्हिडीओतून सिलेक्ट करता येणार प्रोडक्ट

आता Youtube बनणार शॉपिंग हब; व्हिडीओतून सिलेक्ट करता येणार प्रोडक्ट

Google आपल्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म Youtubeला Amazon आणि Flipkart प्रमाणे शॉपिंग हब बनवण्याची तयारी करत आहे. सध्या कंपनी शॉपिंग फिचरचं टेस्टिंग करत आहे.

  नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : Google आपल्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म Youtubeला Amazon आणि Flipkart प्रमाणे शॉपिंग हब बनवण्याची तयारी करत आहे. आता युजर्स यूट्यूबवर दिसणाऱ्या वस्तू, खेळणी, गॅजेट्स आणि इतर सामान ऑनलाईन विक्रीसाठी सिलेक्ट करू शकणार आहेत. जगातील सर्वात मोठी व्हिडिओ साईट YouTubeने, क्रिएटर्सला Youtube सॉफ्टवेयरचा वापर करून आपल्या क्लिपमध्ये प्रोडक्ट फिचरला टॅग आणि ट्रॅक करण्याचं सांगितलं आहे. त्यानंतर डेटा एनालिटिक्स आणि शॉपिंग टूलद्वारे Googleच्या पॅरेंट कंपनीला लिंग करण्यात येणार आहे. लिंकवर क्लिक करून खरेदी करता येणार - Youtube कडून प्रोडक्टची व्हिडिओ कॅटेगरी बनवली जाईल. या व्हिडिओ कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट विक्रीसाठी लिस्ट केलं जाईल. ग्राहक QR प्रोडक्ट कॅटेगरीच्या लिंकवर क्लिक करून थेट प्रोडक्ट खरेदी करू शकेल. त्याशिवाय कंपनी एका वेगळ्या Shopify Incचं टेस्टिंगही करत आहे. वाचा - Android smartphone टार्गेटवर? Microsoft कडून अँड्रॉईड फोन युजर्सला मोठा इशारा Youtubeच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी शॉपिंग फिचरचं टेस्टिंग करत आहे. जे प्रोडक्ट विक्रीसाठी उपलब्ध केले जातील, त्यावर निर्मात्याचा कंट्रोल असेल. सध्या कंपनी याकडे एक प्रयोग म्हणून पाहत आहे. ई-कॉमर्स स्टार्टअप बास्केटचे अध्यक्ष Andy Ellwood यांनी सांगितलं की, YouTube सर्वात कमी उपयोग केली जाणारी संपत्ती आहे. अशात YouTubeमध्ये गुंतवणूक केल्यास, त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. YouTube यातून रेव्हेन्यू कसा जनरेट करेल, याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. सध्या क्रिएटर्ससाठी सब्सक्रिप्शन ऑफर सुरु करण्यात आली असून पेमेंटवर 30 टक्के सूट दिली जाऊ शकते. वाचा - Hydrogen Fuel वर चालणाऱ्या देशातील पहिल्या कारचं यशस्वी ट्रायल Google बजेट - कोरोना काळात Googleच्या मार्केटिंग बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: ट्रॅव्हल आणि फिजिकल रिटेल सेक्टरमुळे Googleवर मोठा परिणाम झाला. कारण यातूनच Googleला मोठ्या जाहिराती मिळतात. याचदरम्यान, दुसरीकडे ग्राहकांच्या ऑनलाईन शॉपिंगमुळे ई-कॉमर्समध्ये चांगली वाढ झाली. आता Googleने Instagram प्रमाणे शॉपिंग डेस्टिनेशन बनण्याकडे पावलं वळवली आहेत. Google या संधीचा वापर करून Youtubeला शॉपिंग हब बनवण्याच्या तयारीत आहे.

  वाचा - आता गाडी चोरी होण्याची नाही भीती, फक्त 799 रुपयांत सुरक्षित करा बाइक आणि स्कूटर!

  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Google, Youtube

  पुढील बातम्या