Home /News /technology /

Android smartphone टार्गेटवर? Microsoft कडून अँड्रॉईड फोन युजर्सला मोठा इशारा

Android smartphone टार्गेटवर? Microsoft कडून अँड्रॉईड फोन युजर्सला मोठा इशारा

मायक्रोसॉफ्टने अँड्रॉईड युजर्सला इशारा देत, एका नव्या रॅनसमवेयरचा (Ransomware) शोध लावला असून जो अँड्रॉईड स्मार्टफोनला टार्गेट करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : अमेरिकी टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने (Microsoft) अँड्रॉईड फोन युजर्सला (Android Users) इशारा दिला आहे. कंपनीने एका नव्या रॅनसमवेयरचा (Ransomware) शोध लावला असून जो अँड्रॉईड स्मार्टफोनला  (Android Smartphone) टार्गेट करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा Ransomware मॅलिशियम अँड्रॉईड ऍप्समध्ये लपून राहतो आणि ऑनलाईन फोरम आणि वेबसाईटद्वारे पसरतो. त्यामुळे कोणत्याही वेबसाईटवरुन ऍप्स डाऊनलोड करताना सावध राहण्याचा इशारा मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आला आहे. स्क्रिन लॉक - कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रॅनसमवेयर अँड्रॉईड युजर्सला फोनची स्क्रिन ऍक्सेस करण्यापासून रोखतो. हा डिव्हाईसला इनक्रिप्ट करत नाही, स्क्रिनला एका मेसेजद्वारे फ्रीज करतो. हा कॉल नोटिफिकेशनचा फायदा घेऊन इनकमिंग कॉलवेळी सक्रिय होतो. त्याशिवाय युजरने होम किंवा रिसेंटवर क्लिक केल्यास स्क्रिन लॉक होते. डिव्हाईस ऍक्सेस ब्लॉक - मायक्रोसॉफ्टने सांगितलं की, हा रॅनसमवेयर स्क्रिनवर एका मेसेजसह डिव्हाईसचा ऍक्सेस ब्लॉक करतो. ही स्क्रिन प्रत्येक विंडोमध्ये दिसते, म्हणजे युजर फोनमध्ये काही इतर गोष्टी करून शकत नाही. स्क्रिनवर एक थ्रेट मेसेज असतो आणि रॅनसमवेयरला पैसे देण्याचे निर्देश असतात. दरम्यान, रशिया, चीन, ईराणशी संबंधित हॅकर्स अमेरिकेत आगामी राष्ट्रपती निवडवणूकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मायक्रोसॉफ्टकडून सांगण्यात आलं आहे. हे हॅकर्स निवडवणूक प्रक्रियेशी संबंधित लोक आणि ग्रुपची हेरगिरी करत असल्याचीही माहिती आहे. 2016 मध्ये राष्ट्रपती निवडवणूका प्रभावित करणारा रशियन हॅकर्स ग्रुप पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने केला आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या