Hydrogen Fuel वर चालणाऱ्या देशातील पहिल्या कारचं यशस्वी ट्रायल

Hydrogen Fuel वर चालणाऱ्या देशातील पहिल्या कारचं यशस्वी ट्रायल

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि केपीआयटी टेक्नोलॉजीने देशात हायड्रोजन इंधन सेलपासून (HFC) चालणाऱ्या पहिल्या प्रोटोटाईप कारचं यशस्वी परीक्षण केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : देशात होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत (Air Pollution) नेहमीच रस्त्यांवरील वाढत्या वाहनांना मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरवलं जातं. अशात वायू प्रदूषण आणि ग्रीन हाऊस गॅसेसचं (Greenhouse Gases) उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठी मागणी केली जाते. यादरम्यान, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि केपीआयटी (KPIT) टेक्नोलॉजीने देशात हायड्रोजन इंधन सेलपासून (HFC) चालणाऱ्या पहिल्या प्रोटोटाईप कारचं यशस्वी परीक्षण केलं आहे.

हानीकारक ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनात कमी -

HFC पूर्णपणे देशात विकसित केलेला इंधन सेल स्टॅक (fuel cell)आहे. HFC हे तंत्रज्ञान विद्युत उर्जा निर्माण करण्यासाठी हायड्रोजन ऑक्सिजन दरम्यान (हवेने) रासायनिक क्रियांचा उपयोग करते आणि जीवाश्म इंधनाच्या (Fossil Fuel) वापरला संपवते. हे तंत्रज्ञान केवळ पाणी सोडते आणि अशाप्रकारे इतर वायू प्रदूषकांसह हानीकारक ग्रीनहाऊस वायूंचं उत्सर्जन कमी करण्यास मदत करते.

वाचा - भारतात मिळणार कारमधून उडण्याची मजा? गुजरातमध्ये तयार होणार फ्लाईंग कार

इंधन सेल स्टॅकचा, विद्युत उर्जा निर्माण करणाऱ्या बॅटरीशी संबंध असतो. ज्यांना एकत्रित करण्यासाठी मोठ्या जागेची गरज नसते. यांना सात सीटरवाल्या कारमध्ये सहजपणे फिट केलं जाऊ शकतं. हे तंत्रज्ञान 65 ते 70 डिग्री सेल्सियस तापमानावरही कामं करतं, जे वाहन चालवताना निर्माण होणाऱ्या उष्णतेला सहन करु शकतं.

इलेक्ट्रॉनिक कारमध्ये इंधन सेल फिट करुन यशस्वी ट्रायल -

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि केपीआयटीने (KPIT) 10 किलोवॅटची इलेक्ट्रिक बॅटरी (Electric Battery) तयार केली आहे. HFC तंत्रज्ञानाचा वापर जसं-जसा वाढेल, तसा प्रदूषणाचा स्तर कमी होईल. याच्या ट्रायलसाठी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये इंधन सेल फिट करण्यात आलं होतं.

वाचा - महिंद्रा कंपनी या गाडीच्या खरेदीवर ग्राहकांना फ्री देतेय 1 लाखांचा कोरोना विमा

मोठी वाहनं चालवण्यासाठी अधिक उर्जा लागते, त्यामुळे हे तंत्रज्ञान बस आणि ट्रकसारख्या मोठ्या वाहनांसाठी अत्यंत प्रभावी ठरेल असं मानलं जातं. HFC या तंत्रज्ञानात छोट्या बॅटरीपासून मोठ्या प्रमाणात विद्युत उर्जा निर्माण केली जाते.

वाचा - आता गाडी चोरी होण्याची नाही भीती, फक्त 799 रुपयांत सुरक्षित करा बाइक आणि स्कूटर!

KPITचे अध्यक्ष रवी पंडित यांनी सांगितलं की, या तंत्रज्ञानाला चांगलं भविष्य आहे आणि याच्या स्वदेशी विकासामुळे हे अधिक व्यवसायिकदृष्ट्या व्यवहार्य होण्याची अपेक्षा आहे. तसंच, देशातील वाहतूक व्यवस्थेत हायड्रोजन आधारित नूतनीकरणक्षम उर्जेचा इंधन म्हणून वापर करण्याची वेळ आली असल्याचं, CSIRच्या नॅशनल केमिकल लॅबचे संचालक अश्विनीकुमार नांदिया यांनी सांगितलं.

Published by: Karishma Bhurke
First published: October 11, 2020, 3:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या