मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता गाडी चोरी होण्याची नाही भीती, फक्त 799 रुपयांत सुरक्षित करा बाइक आणि स्कूटर!

आता गाडी चोरी होण्याची नाही भीती, फक्त 799 रुपयांत सुरक्षित करा बाइक आणि स्कूटर!

ग्रिप लॉक कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाही, तर एक साधारण दिसणारं लॉक आहे. जे चावीने उघडतं आणि बंद होतं. पण याची विशेष बाब म्हणजे हे सहजपणे तोडलं जाऊ शकत नाही, उघडलं जाऊ शकत नाही आणि कापलंही जात नाही.

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : सणा-सुदीच्या काळात लोकांची खरेदीसाठी लगबग असते. यादरम्यान बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या गर्दीत गाडी पार्किंगसाठीही जागा नसते आणि या परिस्थितीत अनेक जण रस्त्याच्याकडेला, इथे-तिथे गाडी पार्क करतात. पण अशावेळी खरेदीपेक्षा अधिक लक्ष गाडीकडेच असतं. अनेकदा लॉक तोडून बाईक, स्कूटर चोरी होण्याची शक्यता असते. पण आता एक असं लॉक आलं आहे, ज्याने गाडी पूर्णपणे सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

ग्रिप लॉक -

ग्रिप लॉक कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाही, तर एक साधारण दिसणारं लॉक आहे. जे चावीने उघडतं आणि बंद होतं. पण याची विशेष बाब म्हणजे हे सहजपणे तोडलं जाऊ शकत नाही, उघडलं जाऊ शकत नाही आणि कापलंही जात नाही. हे लॉक स्टेनलेस स्टील-अलॉय मेटल आणि फायबरने तयार झालेलं असल्याने अतिशय मजबूत आहे. याचा आकारही छोटा असल्याने, सहजपणे कुठेही घेऊन जाता येऊ शकतं.

हे वाचा - Jio युजर्ससाठी खुशखबर; या खास सुविधेसाठी कोणताही चार्ज नाही, Netflixही फ्री

याला दोन कम्पार्टमेंट देण्यात आले आहेत. एकात हँडलबारचं ग्रिप आणि दुसरं ब्रेक लिवरचं. चावीच्या मदतीने उघडून यात असलेल्या कम्पार्टमेंटदरम्यान ग्रिप आणि ब्रेक ठेवा फोल्ड करुन, अनलॉक करा. हे उघडण्यासाठी केवळ 10 सेकंदाचा वेळ लागतो. लॉक झाल्यानंतर हे फ्रंट ब्रेकला दाबून ठेवतं. जर कोणी गाडी चोरण्याचा प्रयत्न केला, तर पुढचा ब्रेक दाबला असल्याने गाडी पुढे घेऊन जाता येणार नाही आणि एक्सिलेटरही वापरता येणार नाही.

हे वाचा - Exclusive: Paytm वॉलेटचा वापर करत असाल, तर हे वाचाच...

ग्रिप लॉकची किंमत

ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर (Amazon) ग्रिप लॉक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ब्रँडनुसार याच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. अमेझॉनवर सर्वात स्वस्त ग्रिप लॉक 779 रुपयांचं आहे. तर 9500 रुपयांचं हँडलबार ग्रिप लॉकही उपलब्ध आहे.

हे वाचा - कमाल! एक मिनिट हँड-स्टँडमध्ये 35 योगासनं; 11 वर्षीय निधीचा वर्ल्ड रेकॉर्ड

First published: