• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • असा करा Oximeter चा योग्य वापर, अचूक समजेल Oxygen Level

असा करा Oximeter चा योग्य वापर, अचूक समजेल Oxygen Level

ऑक्सिमीटरमध्ये ब्लड ऑक्सिजन लेवलसह हार्ट-रेटही तपासता येतो. फिंगरटीप ऑक्सिमीटरचा योग्य प्रकारे वापर केल्यास, अचूक रिझल्ट समजू शकतो. यासाठी ऑक्सिमीटर योग्य प्रकारे वापरणं गरजेचं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 मे : कोरोनाच्या काळात ऑक्सिमीटर (Oximeter) घरात असणं गरजेचं असून हे सध्या महत्त्वाचं गॅजेट बनलं आहे. भारतात परवडणाऱ्या किंमतीत अनेक Oximeter उपलब्ध आहेत. Oximeter तीन प्रकारचे असतात. यात फिंगरटीप पल्स ऑक्सिमीटर, हेंडहेल्ड ऑक्सिमीटर आणि Fetal पल्स ऑक्सिमीटर सामिल आहे. घरी ऑक्सिजन लेवल (Oxygen Level) तपासण्यासाठी फिंगरटीप Oximeter चा वापर केला जातो. यामुळे ब्लड ऑक्सिजन लेवल सहजपणे समजते. इतर दोन Oximeter चा वापर रुग्णालयात केला जातो. ऑक्सिमीटरमध्ये ब्लड ऑक्सिजन लेवलसह हार्ट-रेटही तपासता येतो. फिंगरटीप ऑक्सिमीटरचा योग्य प्रकारे वापर केल्यास, अचूक रिझल्ट समजू शकतो. यासाठी ऑक्सिमीटर योग्य प्रकारे वापरणं गरजेचं आहे, याद्वारेच योग्य ऑक्सिजन लेवल रिडिंग घेता येऊ शकतं.

  (वाचा - Alert! शरीरातील Oxygen लेवल तपासण्यासाठी अ‍ॅप वापरताय, तर आधी हे वाचा)

  - सर्वात आधी शरीर एकदम रिलॅक्समध्ये ठेवा. ब्लड ऑक्सिजन लेवल चेक करण्याआधी शरीर शांत असणं आणि जवळपास 10 मिनिटं आराम करणं आवश्यक आहे. कोणतीही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी करू नका. - त्यानंतर सरळ बसा. ऑक्सिमीटर अंगठ्याच्या बाजूच्या बोटाला लावा. ऑक्सिमीटर बोटाच्या टोकावर लावा. रिडिंग होईपर्यंत स्थिर राहा.

  (वाचा - Coronavirus: पल्स Oximeter खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

  - ऑक्सिमीटर अंगठ्याच्या बाजूच्या बोटाला किंवा मधल्या बोटालाही लावता येऊ शकतं. ते नखांवर लावू नये. ऑक्सिमीटर बोटाच्या त्वचेच्या थेट संपर्कात येणं गरजेचं आहे. डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बोटाला लावू शकता.

  (वाचा - तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत)

  - रिडिंग होईपर्यंत कोणतीही हालचाल करू नका. सुरुवातीचे काही रिझल्ट सोडून त्यानंतर रिडिंगकडे लक्ष द्या. Spo2 मध्ये कमीत-कमी तीन वेळा चेक करा. लेवल 94 टक्क्यांहून कमी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  Published by:Karishma Bhurke
  First published: