नवी दिल्ली, 27 एप्रिल : देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांची ऑक्सिजन लेवल ड्रॉप होते. त्यामुळे डॉक्टर्स, एक्सपर्ट्स कोरोना रुग्णांना सतत त्यांची ब्लड ऑक्सिजन लेवल ट्रॅक करण्यासाठी ऑक्सीमीटरचा वापर करण्याचा सल्ला देतात. अनेकदा लोक Oximeter चा वापर चुकीच्या पद्धतीने करतात आणि ऑक्सीमीटरवर चुकीचे परिणाम पाहून पॅनिकची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे ऑक्सीमीटरचा योग्यरित्या वापर करणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने कोरोना रुग्णांसाठी ब्लड ऑक्सिजन लेवल ट्रॅक ठेवण्यासाठी योग्य पद्धत सांगितली आहे. ऑक्सीमीटरचा उपयोग ऑक्सिजन लेवल आणि हार्ट रेट तपासण्यासाठी केला जातो. अनेकदा ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी ऑक्सिजन लेवल चेक करणं गरजेचं ठरतं.
(वाचा - Alert! शरीरातील Oxygen लेवल तपासण्यासाठी अॅप वापरताय, तर आधी हे वाचा )
- आपलं बोट ऑक्सीमीटरमध्ये टाकण्याआधी नेलपॉलिश, नकली नखं असल्यास ती हटवावित. तसंच हात साबणाचे स्वच्छ करावेत. - ऑक्सिजन लेवल चेक करण्याआधी कमीत-कमी पाच मिनिटं आराम केला पाहिजे. - आपला हात आपल्या छातीवर ठेवून आराम द्या आणि काही वेळ असंच राहा. - आता ऑक्सीमीटरमध्ये मधलं बोट किंवा पहिलं बोट ठेवा आणि चेक करा. - रीडिंगमध्ये चढ-उतार होऊ शकतात, त्यामुळे स्टेबल होण्याची वाट पाहा. जर रीडिंग स्थिर होत नसेल, तर ऑक्सीमीटर तसंच ठेवून कमीत-कमी एक मिनिट किंवा त्याहून अधिक वेळ वाट पाहा. - जर पाच सेकंदमध्ये रिझल्ट बदलला नाही, तर रीडिंग नोट करा.
The pulse oximeter is used to measure the oxygen level (oxygen saturation) of the blood. But do you know how does it work? Take a look! #IndiaFightsCorona pic.twitter.com/YAToaH8hIq
— MyGovIndia (@mygovindia) April 24, 2021
(वाचा - घरीच कोरोनावर उपचार घेताना शरीरातील Oxygen कमी झाल्यास काय करावं? पाहा हा VIDEO )
एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक सहा तासांनी ऑक्सिजन लेवलवर नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. बेसलाईन सॅच्युरेशन 94 टक्क्याहून खाली असू नये. जर 94 टक्क्यांहून कमी असेल, तर डॉक्टर्सशी संपर्क करण्याची आवश्यकता आहे.