नवी दिल्ली, 26 एप्रिल : भारतात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अनेकदा अफवा, Whatsapp फॉर्वर्ड मेसेज, चुकीचे मेसेजही फिरत आहे. कोरोना झाल्यास, अनेक रुग्णांची ब्लड ऑक्सिजन लेवल ड्रॉप होते आणि अशावेळी डॉक्टर ऑक्सिजन लेवल सतत चेक करण्याचा सल्ला देतात.
ब्लड ऑक्सिजन लेवल चेक करण्यासाठी ऑक्सिमीटर डिव्हाईस मिळतात, याद्वारे ऑक्सिजन लेवल टेस्ट केली जाते. आजकाल स्मार्टवॉच आणि फिटनेट बँडमध्येही Spo2 म्हणजेच ऑक्सिजन मॉनिटरचा सपोर्ट दिला जातो. परंतु सध्या असे मेसेज फिरत आहेत, ज्यात App वरुन ऑक्सिजन लेवल मॉनिटर करता येईल, असं म्हटलं जातंय.
परंतु हे चुकीचं आहे. कोणतंही अॅप असं करू शकत नाही. विना हार्डवेअर डिव्हाईस कोणतंही अॅप तुमची ब्लड ऑक्सिजन लेवल सांगू शकत नाही. गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप्स आहेत, ज्यात ब्लड ऑक्सिजन लेवल मॉनिटर करण्याचं फीचर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जर तुम्हीही ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी अशा कोणत्याही अॅपवर विश्वास ठेवला असेल आणि ते अॅप डाउनलोड केलं असेल, तर ते त्वरित डिलीट करा. ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल ऑक्सिमीटरनेच चेक करा, हाच योग्य पर्याय असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
गुगल प्ले स्टोअरवर असलेले काही बनावट अॅप्स ब्लड ऑक्सिजन लेवल चेक करण्याच्या नावाखाली पैसे घेत असल्याचंही समोर आलं आहे. हा एक प्रकारे स्पायवेअर आहे. म्हणजे अॅप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर युजरचा खासगी डेटा चोरी होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा कोणत्याही अॅपवर विश्वास ठेऊ नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.