नवी दिल्ली, 23 मे : इंटरनेटच्या या काळात अनेक न्यूज व्हायरल होत असतात. त्यापैकी काही न्यूज फेक न्यूजही (Fake News) असतात. परंतु आता ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook) आणि गुगलसारखे (Google) मोठे प्लॅटफॉर्म फेक न्यूजवर लगाम लावण्याचे सातत्याने प्रयत्न करत आहेत. ट्विटरने फेक न्यूजला manipulated media चा टॅग देणं सुरू केलं आहे. तर फेसबुकवरही Fake News ट्रॅक करण्यासाठी काही टूल्स आहेत. आता Google ही एक नवं फीचर लाँच करणार आहे, जे युजर्सला फेक न्यूजबाबत माहिती देईल.
काय आहे Google चं नवं फीचर -
गुगलने नुकत्याच झालेल्या आपल्या वार्षिक सभेत About this Result फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर गुगल सर्च केल्या गेलेल्या गोष्टीच्या sources बाबत माहिती देईल. त्याशिवाय ज्या वेबसाईटची ती लिंक आहे, ती किती विश्वासार्ह आहे, याबाबतही युजर्सला माहिती मिळेल. यासाठी गुगल इनसायक्लोपीडिया Wikipedia सोबत काम करत आहे.
असं करेल काम -
या फीचरद्वारे युजर ज्यावेळी गुगलवर एखादी माहिती सर्च करेल, त्यावेळी नेहमीप्रमाणे अनेक वेबसाईट्सच्या लिंक ओपन होतील. त्यानंतर युजरला लिंकच्या बाजूला असलेल्या तीन डॉट मेन्यूवर क्लिक करावं लागेल. ती वेबसाईट सिक्योर आहे की नाही याबाबत Google माहिती देईल. तसंच वेबसाईटची माहिती विकीपीडियावर उपलब्ध आहे की नाही, जी लिंक तुम्ही वाचत आहात, ती Paid तर नाही ना, अशा गोष्टींची माहिती गुगलकडून दिली जाईल.
गुगल तुम्ही सर्च केलेली माहिती नेमकी कुठून येत आहे याबाबत सांगेल, त्यामुळे युजरला त्या साईटवर किती विश्वास ठेवावा हे समजण्यास मदत होईल. हे फीचर अमेरिकेत यावर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आलं होतं. आता यावर्षाच्या अखेरीस हे फीचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे फीचर केवळ इंग्रजी भाषेच्या रिझल्टसाठी काम करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.