Home /News /technology /

Fake News: बातमी खरी आहे की खोटी; अशी मिळवा माहिती, पाहा सोपी पद्धत

Fake News: बातमी खरी आहे की खोटी; अशी मिळवा माहिती, पाहा सोपी पद्धत

PIB Fact Check युजर्सला माहिती देतं, की त्यांना जे फोटो, डॉक्युमेंट मिळाले आहेत, ते खरे आहेत की खोटे. यामुळे त्या गोष्टीबाबत सत्यता पडताळणी करण्यास मदत मिळते.

  नवी दिल्ली, 22 मे : देशात पसरणाऱ्या अफवांदरम्यान, तसंच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांमुळे लोक खऱ्या आणि खोट्या बातम्यांचा अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे अनेकदा भीती, फेक न्यूजमुळे गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. सरकारही अशाप्रकारच्या Fake News पासून सावध राहण्याचा सल्ला देतं. PIB Fact Check - देशातील सरकारनेही फेक न्यूजबाबत योग्य माहिती देण्यासाठी PIB Fact Check जारी केलं आहे. PIB Fact Check युजर्सला माहिती देतं, की त्यांना जे फोटो, डॉक्युमेंट मिळाले आहेत, ते खरे आहेत की खोटे. यामुळे त्या गोष्टीबाबत सत्यता पडताळणी करण्यास मदत मिळते. तुमच्याकडे असलेली कोणतीही न्यूज खरी की खोटी हे तपासण्यासाठी युजरकडे एखाद्या न्यूजसंबंधी whatsapp मेसेज, Voice Recording, स्क्रिनशॉट अशा गोष्टी असणं गरजेचं आहे.

  (वाचा - तुमचं Account, Password सुरक्षित कसं ठेवाल? Google ने सांगितल्या खास टिप्स)

  अशी मिळेल माहिती - - सर्वात आधी PIB Fact Check पोर्टलवर क्लिक करुन ते ओपन करा. आता तुमची भाषा निवडा. - ईमेल अ‍ॅड्रेस आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. - रजिस्टर्ड Email अ‍ॅड्रेसवर एक OTP येईल, तो टाईप करुन सबमिटवर क्लिक करा. - त्यानंतर युजरला नवा फॉर्म भरावा लागेल. यात युजरचं नाम, ईमेल अ‍ॅड्रेस, न्यूजची कॅटेगरी टाकावी लागेल. - आता युजरला फॅक्ट चेक कंटेंटची ओरिजनल कॉपी, टेक्स इत्यादी माहिती द्यावी लागेल.

  (वाचा - तु्म्हीही पॉर्न सर्च केलं का? Google ने आता उचललं मोठं पाऊल)

  - त्यानंतर युजरकडे असलेलं रेफरन्स मटेरियल अपलोड करावं लागेल. फोटो, व्हिडीओ, ऑडिओ क्लिप अपलोड करता येऊ शकते. - एकदा फॉर्म भरुन झाल्यानंतर, वेरिफिकेशनसाठी कॅप्चा टाकावा लागेल आणि सबमिट रिक्वेस्टवर क्लिक करावं लागेल. - त्यानंतर PIB युजरने दिलेल्या माहितीनुसार, त्यासंबंधीची पडताळणी करेल आणि युजरने दिलेल्या ईमेलवर त्याबाबत माहिती दिली जाईल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Fake news, Tech news

  पुढील बातम्या