जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 15000 हून कमी किंमतीत खरेदी करता येतील हे 5 Smartphone; पाहा फीचर्स

15000 हून कमी किंमतीत खरेदी करता येतील हे 5 Smartphone; पाहा फीचर्स

15000 हून कमी किंमतीत खरेदी करता येतील हे 5 Smartphone; पाहा फीचर्स

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये दिवसेंदिवस नवनवीन smartphone येत आहेत. यात सॅमसंग, रेडमी, ओप्पो आणि वीवो च्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. त्यामुळं आता 15 हजारांहुन कमी किंमतीत मिळणाऱ्या या स्मार्टफोनची पाहा लिस्ट…

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये दिवसेंदिवस नवनवीन Smartphone येत आहेत. यात Samsung, Redmi, Oppo आणि Vivo कंपनीच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. त्यामुळे आता युजर्सलाही स्मार्टफोन्स खरेदी करताना वेगवेगळे पर्याय उपलब्ध होत आहेत. आता युजरला अधिक रॅम आणि चांगल्या बॅटरीसह (best mobile under 15000 with best camera) काही स्मार्टफोन पर्याय उपलब्ध असून फ्लिपकार्ट आणि Amazon वर ऑनलाईन तसंच ऑफलाइन पद्धतीनेही खरेदी करता येतील. Realme Narzo 50A या स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम आणि 128 GB Internal Storage देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 6.5 इंची एचडी प्लस डिस्प्लेही देण्यात आला आहे. कमी किंमतीत बजेटमध्ये चांगले फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरू शकतो. यात 6000 mAh बॅटरी, मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच ट्रिपल रियर कॅमरा सेटअपही देण्यात आला आहे. यात एक कॅमेरा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. त्याशिवाय 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 12499 रूपये इतकी आहे.

तुमचा Smartphone तुम्हाला आजारी पाडू शकतो, कसा कराल स्वत:चा बचाव?

POCO M3 POCO कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत 11499 रुपये इतकी आहे. यात 6 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये फोन 6000 mAh क्षमतेचा बॅटरी बॅकअप, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल, तर फ्रंट कॅमेरा 8 MP चा आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंची फुल एचडी प्लस डिस्प्ले आलं आहे. Realme 8i Realme कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत 13999 रूपये आहे. यात 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. 5000 mAh चा बॅटरी बॅकअप, मीडियाटेक हेलियो जी 96 प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

आता Mobile Data संपला तरी नो टेन्शन, विना Internet असं वापरता येईल WhatsApp

Samsung Galaxy F22 Samsung च्या या स्मार्टफोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे. या Smartphone ची किंमत 14999 रूपये आहे. यात (Samsung Galaxy F22 features and specifications)  6.4 इंची एचडी प्लस डिस्प्ले आणि 6000 mAh क्षमतेचा बॅटरी बॅकअप, मीडियाटेक हेलियो जी80 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप असून यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Google Update: 9 नोव्हेंबरपासून बदलणार लॉगइनची पद्धत; गुगलनं उचललं मोठं पाऊल

REDMI Note 10S रेडमी कंपनीचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून 15190 रूपयांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि बॅक पॅनलला क्वाड कॅमेरा सेटअप असून प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरा 13 MP चा देण्यात आला आहे. त्याचबरोबर रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंची फुल एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेक हेलियो जी 95 प्रोसेसर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात