• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • आता Mobile Data संपला तरी नो टेन्शन, विना Internet असं वापरता येईल WhatsApp

आता Mobile Data संपला तरी नो टेन्शन, विना Internet असं वापरता येईल WhatsApp

WhatsApp ने आणखी एक फीचर लाँच केलं आहे. जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसेल, तरीही आता सेकंडरी डिव्हाइस म्हणजेच लॅपटॉप, कंप्यूटरवर WhatsApp चालवता येईल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : जगातील सर्वात पॉप्युलर इन्स्टंट मेसेजिंग App, WhatsApp ने मागील काही दिवसांत अनेक फीचर्स आणले आहेत. आता WhatsApp ने आणखी एक फीचर लाँच केलं आहे. जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसेल, तरीही आता सेकंडरी डिव्हाइस म्हणजेच लॅपटॉप, कंप्यूटरवर WhatsApp चालवता येईल. WhatsApp चं नवं फीचर - WhatsApp ने काही दिवसांपूर्वी आपल्या बीटा वर्जनवर मल्टी-डिव्हाइस सपोर्ट नवं फीचर लाँच केलं. ज्यात Android आणि iOS युजर्स फोनमध्ये इंटरनेट नसतानाही लॅपटॉपवर WhatsApp वापरु शकतात. या फीचरमुळे युजर्स एकाच वेळी चार डिव्हाइसवर एकत्र WhatsApp ओपन करुन चॅटिंग करू शकतात. यासाठी स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं नाही. काय आहेत फायदे - जुलैमध्ये अनेक टेस्टिंगनंतर हे फीचर लाँच करण्यात आलं. या फीचरच्या मदतीने लॅपटॉप, डेस्कटॉप, मॅक किंवा फेसबुक पोर्टलसारख्या प्लॅटफॉर्म्स किंवा डिव्हाइसवर लॉग-इन करुन मेसेज रिसिव्ह करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी वापर करू शकतो. सेकंडरी डिव्हाइसवरही WhatsApp ने आपलं एंड-टू-एंड इन्क्रिप्शन फीचर लागू केलं आहे. यामुळे तुमचे मेसेज कोणीही पाहू शकत नाही. याआधी WhatsApp लॅपटॉपमध्ये वापरताना फोन जवळ असणं गरजेचं होतं. परंतु नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अपडेटनंतर सेकंडरी डिव्हाइसवर WhatsApp चा वापर करताना स्मार्टफोनमध्ये इंटरनेट असणं गरजेचं नाही. तसंच फोन जवळपास असणंही गरजेचं नाही. जर फोन बॅटरी डिस्चार्ज झाली, तरीही दुसऱ्या डिव्हाइसवर WhatsApp चालू राहील.

  WhatsApp मध्ये होणार हा मोठा बदल, रोजच्या वापरातील हे महत्त्वाचे फीचर बदलणार

  कसा कराल या फीचरचा वापर? तुमचं WhatsApp Account कोणत्याही सेकंडरी डिव्हाइसशी लिंक करण्यासाठी सर्वात आधी WhatsApp लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या स्मार्टफोनवर WhatsApp ओपन करा आणि स्क्रिनवर डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. जसं त्या डॉट्सवर क्लिक कराल, एक ड्रॉप-डाउन मेन्यू ओपन होईल. यात तिसरा Linked Devices पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि multi device beta पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Join Beta पर्याय दिसेल. हा ऑप्शन हवं तेव्हा ऑफही करता येतो. त्यानंतर फोनमध्ये तुमचं डिव्हाइस पुन्हा एकदा स्कॅन करावं लागेल. सध्या हे फीचर WhatsApp बीटा वर्जनसाठी जारी करण्यात आलं आहे. जर कोणत्याही एका डिव्हाइसमध्ये मेसेज डिलीट केला, तर तो दुसऱ्या डिव्हाइसमध्ये दिसणार नाही. हे फीचर सध्या iPhone साठी देण्यात आलेलं नाही.
  Published by:Karishma
  First published: