नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : Smartphone जवळपास प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील महत्त्वाची वस्तू आहे. काम करताना, फिरताना किंवा अगदी झोपतानाही स्मार्टफोन प्रत्येकाकडे असतो. आपण दिवसभरात कुठेही हात लावून नंतर तेच हात स्मार्टफोनला लावतो. अशाने डिव्हाइसच्या डिस्प्लेवर जीव-जंतू जमा होतात. काही उपायांनी, काही गोष्टी लक्षात ठेवल्यास स्मार्टफोनपासून होणाऱ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.
आपण कुठेही जाताना स्मार्टफोन सोबत असतो. अनेक ठिकाणचे जीव-जंतू, व्हायरस त्यावर सेटल होतात. याच व्हायरस असणाऱ्या स्क्रिनला हात लावून आपण Coronavirus सारख्या धोकादायक आजारांना आमंत्रणचं देतो. त्यामुळे फोनची स्वच्छताही अतिशय आवश्यक आहे.
- बाहेरुन आल्यानंतर आपल्या स्वच्छतेसह स्मार्टफोन किंवा इतर कोणतंही डिव्हाइस सॅनिटाइज किंवा डिसइन्फेक्ट करणं गरजेच आहे. ज्या गोष्टी पुन्हा घरात येऊन वापरायच्या आहेत त्याची स्वच्छता करणं महत्त्वाचं ठरतं.
- फोन साफ करण्यासाठी सॅनिटाइज करताना सर्वात आधी फोनवर असलेले फिंगरप्रिंट साफ करा. त्यानंतर एखाद्या डिसइन्फेक्ट स्प्रेचा वापर करा.
- स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कोणतंही डिव्हाइस साफ करताना, थेट डिव्हाइसच्या स्क्रिनवर सॅनिटाइजर स्प्रे करू नका. यामुळे स्क्रिन डॅमेज होऊ शकते. डिसइन्फेक्ट स्प्रे साफ आणि मऊ कापडावर स्प्रे करा आणि त्यानंतर स्क्रिन स्वच्छ करा. महत्त्वाची बाब म्हणजे, एका अशा डिसइन्फेक्टचा वापर करा जो 70 टक्के अल्कोहल बेस्ड असेल.
- स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कोणतंही डिव्हाइस साफ करताना या प्रोसेसवेळी डिव्हाइस स्विच ऑफ करा. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे डिव्हाइस चार्जला असताना ते कधीही साफ करू नये. यामुळे डिव्हाइसमध्ये मॉइस्चर जाण्याची शक्यता असते.
- स्मार्टफोनसह त्याचं कव्हरही साफ करणं गरजेचं आहे. कव्हरलाही अनेक जीव-जंतू असतात. त्यामुळे कव्हर साबण-पाण्याने साफ करणं आवश्यक आहे.
या काही सोप्या पण अतिशय आवश्यक असलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यास धोकादायक आजारांपासून सुरक्षित राहू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone