Home /News /technology /

Google Update: 9 नोव्हेंबरपासून बदलणार लॉगइनची पद्धत; यूझर्सच्या सुरक्षेसाठी गुगलनं उचललं मोठं पाऊल

Google Update: 9 नोव्हेंबरपासून बदलणार लॉगइनची पद्धत; यूझर्सच्या सुरक्षेसाठी गुगलनं उचललं मोठं पाऊल

फेसबुकनंतर गुगलनेही आपल्या यूझर्सच्या डेटाच्या सुरक्षिततेसाठी आता आणखी एक पाऊल उचललं आहे

    सध्या ऑनलाईन सुरक्षेबाबत सर्वच कंपन्या विविध निर्णय घेत आहेत. काही दिवसांपूर्वी फेसबुकने क्लाउडवर सेव्ह होणाऱ्या डेटाला एनक्रिप्शन सुविधा देण्यावर काम सुरू असल्याचं म्हटलं होते. तसंच, फेसबुकने आपली फेस रिकग्निशन टेक्नॉलॉजीही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. फेसबुकनंतर गुगलनेही आपल्या यूझर्सच्या डेटाच्या सुरक्षिततेसाठी आता आणखी एक पाऊल उचललं आहे. गुगलने लागू केलेल्या नव्या नियमानुसार, सर्व वापरकर्त्यांना 9 नोव्हेंबरपासून आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन (Google account login) करण्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन (Two step verification) प्रोसेस करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे यूझर्सच्या अकाउंटमध्ये सुरक्षेचा आणखी एक स्तर जोडला जाईल, असं गुगलने म्हटलं आहे. याबाबत आपण विचार करत असल्याचे कंपनीने मे महिन्यातच स्पष्ट केले होते. लाईव्ह हिंदुस्तानने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गुगलने यावर्षीच्या मे महिन्यात आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये (Google blog post about 2SV) याबाबत माहिती दिली होती. “2021च्या अखेरपर्यंत आम्ही सुमारे 15 कोटी गुगल यूझर्सना 2SV (Two Step Verification) मध्ये ऑटो-इनरोल करण्याचा विचार करत आहोत. यासाठी सुमारे 2 लाख यूट्यूब क्रिएटर्सची गरज भासणार आहे.” असं या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं. गुगल नेहमीच आपल्या यूझर्सच्या सुरक्षेबाबत विविध निर्णय घेत असतं. काही दिवसांपूर्वीच गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून घातक अशी शेकडो ॲप्स काढून टाकली होती. Twitter वर येणार हे भन्नाट अपडेट; पाहा कसं असेल नवं फिचर तुमच्या अकाउंटवर काय परिणाम होणार? टू स्टेप व्हेरिफिकेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला आधीप्रमाणे लॉग इन (Google login process) करता येणार नाही. ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर थेट लॉग इन होण्याऐवजी तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा दुसऱ्या ई-मेल आयडीवर एक ओटीपी (One time Password) पाठवण्यात येईल. हा ओटीपी एंटर केल्यानंतरच तुम्ही आपल्या अकाउंटला लॉगइन करू शकाल. प्रत्येक वेळी लॉगइन करताना तुम्हाला असा ओटीपी मिळेल. विशेष म्हणजे, तुम्ही आधीपासूनच टू स्टेप व्हेरिफिकेशन (google 2SV) सुरू केलं नसेल, तर 9 नोव्हेंबरपासून ते तुमच्या अकाउंटला आपोआप लागू होणार आहे. टू स्टेप व्हेरिफिकेशन सुविधा सुरू करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं गुगल अकाउंट सुरू करावं लागणार आहे. त्यानंतर नेव्हिगेशन पॅनलमधील सिक्युरीटी हा पर्याय निवडा. त्यानंतर गुगल साइन इन (Google Sign in) करण्याच्या पद्धती या पर्यायांमधून ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’ हा पर्याय निवडा. यानंतर स्क्रीनवर देण्यात आलेल्या सूचना फॉलो करून तुम्ही ही सुविधा सुरू करू शकाल. एकंदरीत, आता गुगल लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल फोन जवळच बाळगावा लागणार आहे. तुमचा मोबाईल किंवा ओटीपी ज्याच्याकडे असेल, तीच व्यक्ती तुमच्या अकाउंटवर लॉग इन करू शकणार आहे.
    First published:

    Tags: Google, Technology

    पुढील बातम्या