नवी दिल्ली, 11 मार्च : देशातील सर्वाधिक मृत्यू टू-व्हिलर अपघातात होतात आणि अपघातात अधिकतर मृत्यूची प्रकरणं ही वाहन चालकाने हेल्मेट न घातल्याने होतात. अशात संपूर्ण देशात अशा टू-व्हिलर आल्या, ज्या विना हेल्मेटशिवाय स्टार्टच होऊ शकत नाही तर? तर कदाचित रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात कमी येऊ शकते. एक असं हेल्मेट आहे, जे डोक्यावर न घातल्यास, गाडी स्टार्टच होऊ शकत नाही. बीटेकचा विद्यार्थी असलेल्या हिमांशु गर्गने एक असंच हेल्मेट बनवलं आहे, जे घातल्याशिवाय बाईक स्टार्टच होऊ शकत नाही. हेल्मेट डोक्यातून काढल्या-काढल्या इंजिन आपोआप बंद होईल. उत्तरप्रदेशातील बल्केश्वर येथे राहणारा हिमांशु गर्ग आरबीएस कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याने मार्च 2014 मध्ये त्याची आई जयमाला यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी हेल्मेट घातलं नसल्याने त्यांचा जीव वाचू शकला नाही. त्यानंतर हिमांशुने असा काही विचार केला, ज्याने लोकांचा प्राण वाचवता येऊ शकतो.
(वाचा - स्वस्तात कार खरेदीची सुवर्णसंधी; Hyundaiच्या या कार्सवर 1.5 लाखांपर्यंत बंपर सूट )
एका वर्षाच्या प्रयत्नांनंतर त्याने इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आणि पल्स सेंसरयुक्त एक हेल्मेट तयार केलं आहे. हिमांशुने सांगितलं की, हेल्मेटच्या एका डिव्हाईसला बाईक आणि स्कूटरच्या इंजिनशी जोडल्यानंतर ते काम करतं. हेल्मेट घातल्यानंतरच बाईक स्टार्ट होईल. गाडी स्टार्ट झाल्यानंतर हेल्मेट काढल्यास, इंजिन आपोआप बंद होईल. त्याशिवाय हेल्मेटमध्ये असं तंत्रज्ञान आहे, जे मद्यपानानंतर गाडी स्टार्ट करू शकत नाही. यात मोबाईलही चार्ज करता येणार आहे.
(वाचा - मॅकेनिकचा ‘कार’नामा; कोणतीही पदवी न घेता बनवली पाण्यावर चालणारी Car, VIDEO पाहाच )
हिमांशुने त्याचा हा अविष्कार मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही त्याच्या या टेक्नोलॉजीचं कौतुक करत त्याला प्रोत्साहन रुपात पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. सध्या हिमांशु एक शॉकप्रुफ स्टेबलाइजरवर काम करत आहे, जो शॉर्ट सर्किट होण्यापासून वाचवेल. या स्टेबलाइजरमुळे AC, TV, Freez साठी वेगवेगळे स्टेबलाइजर लावण्याची गरज भासणार नाही.