जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / मॅकेनिकचा 'कार'नामा; कोणतीही पदवी न घेता बनवली पाण्यावर चालणारी Car, हा VIDEO एकदा पाहाच

मॅकेनिकचा 'कार'नामा; कोणतीही पदवी न घेता बनवली पाण्यावर चालणारी Car, हा VIDEO एकदा पाहाच

मॅकेनिकचा 'कार'नामा; कोणतीही पदवी न घेता बनवली पाण्यावर चालणारी Car, हा VIDEO एकदा पाहाच

मोहम्मद रईस महमूद मकरानीने एक अशी कार बनवली आहे, जी पेट्रोल-डिझेल-गॅस नाही, तर चक्क पाण्यावर चालते. पाण्यावर चालणाऱ्या या कारचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 मार्च : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झपाट्याने (petrol diesel price increased) वाढ होत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमती आणि प्रदूषणामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणीही वाढते आहे. अशा महागाईमध्ये एखादी पाण्यावर चालणारी कार आली तर? विचार करणं थोडं कठिण वाटतंय, पण मध्यप्रदेशातील एक मॅकेनिकने हा कारनामा केला आहे. मध्यप्रदेशात राहणाऱ्या 44 वर्षीय मोहम्मद रईस महमूद मकरानीने एक अशी कार बनवली आहे, जी पेट्रोल-डिझेल-गॅस नाही, तर चक्क पाण्यावर चालते. पाण्यावर चालणाऱ्या या कारचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 12 वी पास आहेत मोहम्मद रईस - मोहम्मद रईस बारावी पास आहेत. ते व्यवसायाने मॅकेनिक आहेत. कोणतीही मॅकेनिकची पदवी न घेतलेल्या रईस यांनी हा जबरदस्त कारनामा केला आहे. त्यांनी बनवलेल्या, पाण्यावर चालणाऱ्या या कारसाठी त्यांनी पेटेंटही घेतलं आहे. मकरानी यांच्या या पेटेंटच्या आधारे या कारची निर्मिती एक चायनिज कंपनी करणार आहे. सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, भारतीय कंपन्यांना याबाबत माहिती दिली असून त्यांच्याकडून रईस यांना कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही.

(वाचा -  Petrol-Diesel च्या वाढत्या किंमतीवर लगाम लागणार; सरकारचा मोठा प्लॅन )

मारुती 800 पासून बनवली पाण्यावर चालणारी कार - मकरानी यांनी सांगितलं की, त्यांनी हा प्रयोग 2007 मध्ये सुरू केला होता. त्यानंतर 2012 मध्ये मारुती 800 ला बदलून त्यांनी एक अशी कार तयार केली, जी पाण्यावर चालते. इंजिन बनवण्यासाठी आणि स्टार्ट करण्यासाठी त्यांना जवळपास दीड वर्षांचा कालावधी लागला. या इन्व्हेंशनसाठी मकरानी यांना दुबई आणि चिनी कंपन्यांकडून कॉन्ट्रॅक्टही मिळालं आहे. परंतु त्यांनी मेक इन इंडियातून प्रोत्साहित होऊन सर्व ऑफर रिजेक्ट केल्या.

(वाचा -  Women’s Day Special:‘ती’च्या कार्याला अनोखा सलाम;आनंद महिंद्रांनी शेअर केलाVIDEO )

ही आहेत कारची वैशिष्ट्यं - पाण्यावर चालणाऱ्या या कारमध्ये चार सीट आहेत. ड्रायव्हरसह चार जण यातून प्रवास करू शकतात. या कारमध्ये एक टँक देण्यात आला आहे, ज्यात पाणी भरलं जातं.

पाण्यासह त्यात केमिकल आणि चुन्यासारखे काही पदार्थ टाकले जातात. यात एसेटिलेन गॅस तयार होतो, ज्यावर ही कार चालते. या गॅसमुळे कोणतंही प्रदूषण होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात