नवी दिल्ली, 11 मार्च : जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कोरियाई ऑटोमेकर कंपनी हुंदाईने (Hyundai) आपल्या काही निवडक कार्सवर मार्च महिन्यात बंपर डिस्काउंटची घोषणा केली आहे. कंपनी सँट्रो (Hyundai Santro),ऑरा (Hyundai Aura), Hyundai Elantra आणि कोना ईवी (KONA) यांसारख्या कार्सवर 1.5 लाख रुपयांची सूट देत आहे. हा डिस्काउंट एक्सचेंज ऑफर आणि कॅशशिवाय लॉयल्टी बोनसच्या रुपातही आहे.
हुंदाई इंडिया आपल्या कोना ईवी कारवर (Hyundai KONA) 1.5 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. कंपनी एन्ट्री लेवल कार सँट्रोवर 50 हजार रुपयांची सूट आहे. काही कार्सवर 30 हजार रुपयांचा कॅश बेनिफिट मिळतो आहे. तसंच Hyundai Aura या कारवर 70 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो आहे.
Nios कार्सवर 60 हजार रुपयांचा डिस्काउंट असून त्यात 45 हजार रुपये कॅश डिस्काउंट आहे. तसंच यात 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉरपोरेट डिस्काउंट सामिल आहे.
कंपनीची ही ऑफर मार्च 2021 च्या शेवटपर्यंत आहे. कंपनी सर्वाधिक विक्री होणाऱ्या हुंदाई i20, Verna, Creta, Hyundai Venue या गाड्यांवर कोणताही डिस्काउंट नाही.
दरम्यान, जुनी कार स्क्रॅप करुन नवी कार घेण्याची तयारी दाखवणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जुनी कार स्क्रॅप करण्याच्या बदल्यात नवं वाहन खरेदी करणाऱ्या कंपन्या ग्राहकांना जवळपास 5 टक्के सूट देतील असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
यावर्षी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये (Union Budget 2021-22) जुन्या वाहनांना स्वच्छेनं स्क्रॅप करण्याचं धोरण (The voluntary vehicle scrapping policy) केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. या धोरणानुसार खासगी वाहनं स्क्रॅप करण्याची मर्यादा 20 वर्षे, तर व्यावसायिक वाहनांना स्क्रॅप करण्याची मर्यादा 15 वर्षे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Discount offer, Finance, Hyundai, Money, Nitin gadkari, Tech news