नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : 2021 च्या सुरुवातीपासून अधिकतर Car निर्माता कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली होती. आता टाटा मोटर्स (Tata Motors) ग्राहकांना सप्टेंबर महिन्यात खास ऑफर्स देत आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहक टाटाच्या बेस्ट सेलिंग कार्सवर 40,000 रुपयांची बचत करू शकतात. टाटा मोटर्सच्या या ऑफरमध्ये Tata Harrier, Tata Tigor, Tata Tiago आणि Tata Nexon (Diesel) या बेस्ट सेलिंग कार्स सामिल आहेत. ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत लागू आहे.
टाटा मोटर्सची पॉप्युलर हॅचबॅक आणि सेडान कार Tata Tiago आणि Tata Tigor वर कंपनी 25000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. Tata Nexon च्या डिझेल लाइनअपवर 15000 रुपयांपर्यंतची सूट आहे. तसंच पॉप्युलर कार Tata Harrier वर सप्टेंबर महिन्यात कंपनी 40000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे.
Tata Harrier डार्क एडिशनवर कंपनी 20000 रुपयांची सूट देत आहे. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या या ऑफरचा लाभ ग्राहक कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस रुपात घेऊ शकतील. कंपनीने या ऑफरमध्ये आपल्या Tata Safari, Tata Nexon EV, Tata Tiago NRG आणि Tata Altroz या कार्स सामिल केलेल्या नाहीत.
काय आहे किंमत -
- कंपनीची प्रीमियम एसयूव्ही Tata Harrier ची सुरुवातीची किंमत 14.40 लाख रुपयापासून 21.09 लाख रुपयांपर्यंत आहे.
- Tata Nexon डिझेल लाइनअपची सुरुवातीची किंमत 8.59 लाखांपासून 13.04 लाखांपर्यंत जाते.
- टाटा Tigor ची सुरुवात 5.65 लाख रुपयांपासून असून 7.82 लाखांपर्यंत आहे.
- कंपनीची हॅचबॅक कार Tata Tiago ची सुरुवातीची किंमत 5 लाखांपासून 7.05 लाख रुपयांपर्यंत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tata group