नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : सुरक्षेच्यादृष्टीने टाटा नेक्सॉनने (Tata Nexon) भारतात खरेदीसाठी सर्वात विश्वासार्ह आणि सुरक्षित कार्सपैकी एक असण्यामागे महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. नुकतीच अशी काही प्रकरणं समोर आली, ज्यात टाटा नेक्सॉनचे ड्रायव्हर कोणत्याही हानीशिवाय मोठ्या अपघातात बचावले आहेत. YouTuber निखिल राणाद्वारे याबाबतचा एक व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या एका धोकादायक दुर्घटनेबाबत आहे.
या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने टाटा नेक्सॉन कारमध्ये (Tata Nexon Car) धोकादायक दुर्घटनेचा सामना केल्याचं सांगण्यात आलं आहे. Nexon अतिशय स्पीडमध्ये असताना रस्त्यावर मध्येच आलेल्या एका गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार एका झाडाला आदळली. दुर्घटनेत Tata Nexon ला मोठं नुकसान झालं होतं. विमा कंपनीने याच्या इन्शोरन्सची भरपाईही दिली. याच हिशोबाने कार मालकाला 6 लाख रुपये मिळालेही. त्या कारचं नुकसान झाल्यानंतर त्या मालकाने पुन्हा एकदा हीच नवी कार विकत घेतली. यामागे त्या ग्राहकाचा कंपनीवर असलेला विश्वास व्यक्त होत असल्याचं सांगण्यात आलंय.
देशातील सर्वाधिक विक्री होणारी SUV Tata Nexon -
2017 मध्ये लाँच झाल्यानंतर Tata Nexon देशातील सर्वात विक्री होणारी सब-फोर-मीटर कॉम्पॅक्ट SUVs पैकी एक आहे. मागच्या जनरेशनची टाटा नेक्सॉन ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळालं होतं. Tiago आणि Tigor देखील 4 स्टार रेटिंग कार ठरल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.