जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / पहिल्यांदाच Car खरेदी करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच, चांगल्या डीलसह होईल अधिक सेव्हिंग

पहिल्यांदाच Car खरेदी करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच, चांगल्या डीलसह होईल अधिक सेव्हिंग

पहिल्यांदाच Car खरेदी करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच, चांगल्या डीलसह होईल अधिक सेव्हिंग

तुम्ही प्रथमच कार खरेदी करत असाल तर त्यासाठी काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. यामुळे तुमचं डील फायदेशीर होईल आणि खरेदीपश्चात कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : कार (Car) खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपण जेव्हा कार घेण्याचं नियोजन करतो तेव्हा सर्वप्रथम आर्थिक बाबींचा विचार करतो. त्यानंतर विमा, रोड टॅक्स आदी गोष्टींचा विचार होतो. आज बाजारात अनेक कंपन्यांच्या, वैविध्यपूर्ण फीचर्स (Features) असलेल्या कार उपलब्ध आहेत. कार खरेदी करण्यापूर्वी आपला अपेक्षित प्रवास आणि त्यानुसार आवश्यक फीचर्स निवडण्याचा आपला विचार असतो. सध्याच्या कोरोनाकाळात (Corona) स्वतःची कार असणं महत्त्वाचं मानलं जात आहे. कारण लॉकडाउन किंवा कडक निर्बंधांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर मर्यादा आहेत. अशा वेळी आपत्कालीन स्थितीत आपल्याकडे स्वतःचं वाहन असावं, या विचारानेदेखील अनेक जण कार खरेदी करताना दिसत आहेत. तुम्ही प्रथमच कार खरेदी करत असाल तर त्यासाठी काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. यामुळे तुमचं डील फायदेशीर होईल आणि खरेदीपश्चात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. तुम्ही प्रथमच कार खरेदी करत असाल, तर आपल्याला योग्य वाटेल अशा फायनान्स (Finance) आणि इन्शुरन्स कंपनीची (Insurance Company) निवड करावी. कारण यात डीलर ग्राहकाकडून अधिक पैसे वसूल करण्याची शक्यता असते. तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल अशी फायनान्स आणि इन्शुरन्स कंपनी निवडली तर तुमचं डील चांगलं होऊन बऱ्यापैकी पैशांची बचत होईल. तुम्ही पहिल्यांदाच कार खरेदी करणार असाल तर सेकंड हँड कार (Second hand Car) हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कारण सेकंड हँड कारची किंमत तुमच्या बजेटमध्ये असेल आणि तुम्ही नव्यानेच ड्रायव्हिंग शिकला असला, तर सेकंड हँड कार तुम्ही बिनधास्तपणे चालवू शकाल. तसंच तुम्ही कारसाठी लोन घेत असाल तर त्यासाठी व्याजदरही कमी बसेल. कारण सेकंड हँड कारसाठी कर्जाचा व्याज दर कमी असतो.

    Ola E-Scooter खरेदी करायचा विचार करताय? पाहा किती भरावा लागेल EMI

    जेव्हा कार खरेदी करण्याचा निर्णय तुम्ही घ्याल, तेव्हा आपलं नेमकं बजेट किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. बजेट नक्की केल्यानंतर उपलब्ध रकमेत कोणत्या कार उपलब्ध आहेत, याची माहिती घ्यावी. खरेदीपूर्व बजेटचं नियोजन केल्यानं कार खरेदी करताना तुम्हाला फारशा अडचणी येणार नाहीत. कारची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत 30 ते 35 टक्के असावी, यासाठी नेमकं आर्थिक नियोजन करावं. तसंच कार लोनचा ईएमआय (EMI) तुमच्या पगाराच्या तुलनेत 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, याची काळजी घ्या. या टिप्स फॉलो केल्यास योग्य आर्थिक नियोजनाद्वारे पहिली कार खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न अगदी सहज साध्य होऊ शकतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात