नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: सध्या जुन्या वस्तूंचा पुनर्वापर (Reuse) करण्याला खूप महत्त्व निर्माण झालं आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जुन्या वस्तू पुन्हा वापरणं किंवा त्यापासून एखादी वस्तू तयार करून वापरणं हे ट्रेंड आता समाजाने स्वीकारले आहेत. हे करताना अनेकांना त्यांच्यातील सर्जनशीलतेची (Creativity) जाणीव होते आणि ते काही नवं करून दाखवतात. दिल्लीतील सुभाषनगर भागात राहणाऱ्या नववीमध्ये शिकणाऱ्या 15 वर्षांच्या राजने भंगारातल्या रॉयल एनफिल्ड बाईकपासून इलेक्ट्रिक बाईक (Royal Enfield converted to E-Bike) तयार केली आहे. राजने साध्य केलेल्या यशामुळे सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे. ही बाईक कशी तयार केली याबद्दल राज म्हणाला, ‘कोविडच्या काळात लॉकडाउनमुळे शाळा बंद होती. मग मी जवळच्या एका गॅरेजमध्ये काम केलं आणि बाईकचं सगळं टेक्निकल काम (learnt Technical work) शिकून घेतलं. मग मी आईवडिलांना सांगून भंगारातून एक मोटार बाईक आणि इतर साहित्य खरेदी केलं त्यासाठी 45 हजार रुपये खर्च झाले. मी सुरुवातीला ई-सायकल तयार केली होती. पण मला त्यात स्पीड कंट्रोल (Speed Control) करणारी यंत्रणा बसवता आली नाही. त्यामुळे मी एकदा सायकलवरून पडलो आणि मला मारही लागला होता. मग मी इलेक्ट्रिक बाईक तयार करायचं ठरवलं. ’
Delhi: A 9th standard student has made an electric bike, using scraps of a Royal Enfield bike in Subhash Nagar
— ANI (@ANI) September 17, 2021
"Before this, I made an e-cycle but failed to put in place a speed control mechanism. As a result, I fell during a ride & got injured," Rajan, 15, said yesterday (1/2) pic.twitter.com/HwvfYwikoJ
माध्यमांत छापून आलेल्या बातम्यांनुसार राजने तयार केलेली ई-बाईक एकदा चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर प्रवास करते. ही बाईक 48 व्होल्टचा चार्जर वापरून घरातही चार्ज करता येते. त्यामुळे बाईकच्या बॅटरी चार्जिंगचा (Battery Charging) प्रश्नही सुटला आहे. त्यासाठी वेगळ्या चार्जरची अजिबात गरज नाही.
राज म्हणाला,‘ पहिल्या लॉकडाउनमध्ये मी सायकलवर सगळे प्रयोग करून पाहिले. पण एका महिन्याने माझ्या लक्षात आलं की, आता आपण बाईकवर प्रयोग करायला पाहिजेत. त्यामुळे मग आईवडिलांना समजवून सांगितलं की, मला जुनी भंगारातली बाईक आणि काही साहित्य खरेदी करायचं आहे. त्याला त्यांनी संमती दिली आणि पैसेही दिले. ई-बाईक तयार झाल्यावर आता मला ई-कार (E-Car) तयार करायची आहे.’
आजपासून iPhone 13 सीरिजसाठी प्री-बुकिंग सुरू, असा मिळेल डिस्काउंट
‘माझ्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतात आणि मी प्रयोग करत राहतो. त्यातून बरंच काही शिकायला मिळतं आणि नवीन वस्तू तयार होतात. ही बाईक तयार करण्यासाठीचं साहित्य गोळा करण्यासाठी मला एक महिना लागला. त्यानंतर मी जुन्या रॉयल एनफिल्ड बाईकला इलेक्ट्रिक (Royal Enfield converted to E-Bike) स्वरूपात तयार केलं. यासाठी मला तीन दिवस लागले. आता मला ई-कार तयार करायची आहे आणि मी त्या दिशेने कामही सुरू केलं आहे,’ असं राजने सांगितलं.