जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Facebook वापरताना 'या' चूका पडतील महागात, तुम्हाला देखील अशा सवयी असतील, तर त्या आताच बदला

Facebook वापरताना 'या' चूका पडतील महागात, तुम्हाला देखील अशा सवयी असतील, तर त्या आताच बदला

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्यासाठी वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 22 सप्टेंबर : सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, त्यांपैकी सर्वात लोकप्रिय ऍप आहे, तो म्हणजे फेसबुक. पूर्वीच्या काळात तर बहुतांश लोक फेसबुकच वापरायचे. परंतू वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले, ज्यानंतर युजर्स विभागले गेले. परंतू आजूनही याच्या वारत्याकर्त्यांची कमी नाही. लोक याचा वापर पोस्ट, माहिती, मित्र बनवणे यासारख्या कामांसाठी करतात. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही दूरवर बसून तुमच्या मित्र-मैत्रिणींशी किंवा कुटुंबाशी सहज जोडले जाऊ शकता. मात्र, अनेकवेळा फेसबुक वापरताना आपण अशा काही चुका करतो, ज्या आपल्यासाठी घातक तर ठरू शकतातच, पण यामुळे आपण तुरुंगातही जाऊ शकतो. आज आम्ही अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला अडचणीत आणू शकतात. हे वाचा : स्मार्टफोन कॅमेरा मोजणार रक्तातली ऑक्सिजन पातळी; मिळणार लाखोंना जीवदान फेसबुकवर या चुका करू नका आजच्या काळात फेसबुकवर वॉयलेंट कन्टेन्ट शब्द किंवा व्हिडीओ स्वपरुपात येतात, ज्याला लोकांकडून कोणताही विचार न करता शेअर केलं जातं. पण कसं करणं टाळलं पाहिजे, याशिवाय फेसबुकवर धार्मिक कमेंट करणे टाळले पाहिजे. दाहक सामग्री सामायिक करू नका वापरकर्त्यांनी फेसबुकवर प्रक्षोभक मजकूर शेअर करू नये. असे केल्याने समाजासोबतच तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशी पोस्ट शेअर करून एखाद्याच्या भावना दुखावल्याबद्दल किंवा सामाजिक सलोखा बिघडवल्याबद्दल तुम्हाला तुरुंगातही पाठवलं जाऊ शकतं. मुलींना त्रास देऊ नका जर तुम्ही फेसबुकवर एखाद्या मुलीला मेसेज, व्हिडीओ आणि फोटो पाठवताना जरा सांभाळून, जर तुम्ही त्यांना चुकीची गोष्ट पाठवली असेल, तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण मुलने जर तुम्ही पाठवलेल्या मेसेजबद्दल तक्रार केली, तक अशा परिस्थितीत तुम्हाला तरुंगातही जावे लागू शकते. हे वाचा : एक सेकंद थांबा! ऑनलाईन फोन घेताना तुम्ही तर करत नाही ‘या’ चूका, नाहीतर Offer पडेल महागात धार्मिक टिप्पणी करणे टाळा आजकाल फेसबुकसह इतर सोशल मीडियावर बहुतांश लोक एकमेकांच्या धर्माबद्दल बोलत आहेत. त्यामुळे अनेकवेळा लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. असे केल्याने दंगलही भडकू शकते. तुमच्या कोणत्याही वक्तव्यातून किंवा फेसबुक पोस्टवरून असे घडल्यास तुमच्यावर पोलिस कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. पायरेटेड लिंक्स बनवू नका आम्ही तुम्हाला सांगतो की पायरेटेड चित्रपट विकणे हा गुन्हा आहे. तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल जे कोणत्याही बेकायदेशीर चित्रपटाची पायरेटेड लिंक बनवतात आणि फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विकतात तर पोलिस तुमच्यावर कारवाई करू शकतात. एवढेच नाही तर असे केल्याने तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात