मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

स्मार्टफोन कॅमेरा मोजणार रक्तातली ऑक्सिजन पातळी; मिळणार लाखोंना जीवदान

स्मार्टफोन कॅमेरा मोजणार रक्तातली ऑक्सिजन पातळी; मिळणार लाखोंना जीवदान

या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक सर्व मोबाईल क्रमांकाची माहिती मिळू शकते.

या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक सर्व मोबाईल क्रमांकाची माहिती मिळू शकते.

कोणत्याही आजाराची पूर्वलक्षणं दिसत असतील, तर डॉक्टर आपल्याला रक्त, युरिन आदींमधल्या घटकांची लॅबोरेटरीत तपासणी करण्यास सांगतात.

मुंबई, 22 सप्टेंबर-   कोणत्याही आजाराची पूर्वलक्षणं दिसत असतील, तर डॉक्टर आपल्याला रक्त, युरिन आदींमधल्या घटकांची लॅबोरेटरीत तपासणी करण्यास सांगतात. तसंच लक्षणांचं स्वरूप गंभीर असेल, तर एक्स-रे, 2 डी-इको, एमआरआय, सीटी-स्कॅनसारख्या तपासण्याही आवश्यकतेनुसार करण्यास सांगतात. त्याचप्रमाणे संबंधित रुग्णास डायबेटीस, हृदयविकार असेल तर रक्तदाब आणि ब्लड शुगर लेव्हल तपासण्याचा सल्ला दिला जातो. या दोन्ही चाचण्या रुग्ण घरीच करू शकतात. रक्तातली ऑक्सिजनची पातळी कोणत्याही कारणामुळे कमी झाली, तर रुग्णास त्रास जाणवू लागतो. कोरोना काळात कोरोनाचा संसर्ग झाल्यावर ऑक्सिजन पातळी अर्थात एसपीओटू तपासणी प्राधान्याने केली जात होती. यासाठी खास छोटं यंत्रही बाजारात उपलब्ध आहे; पण आता रक्तातली ऑक्सिजन पातळी स्मार्टफोन कॅमेरा आणि फ्लॅश वापरूनही तपासता येणार आहे. नुकतंच याबाबत एक संशोधन करण्यात आलं असून, येत्या काळात या तपासणीसाठी स्मार्टफोनचा वापर करता येणार आहे. `एबीपी लाइव्ह`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. नव्या संशोधनाच्या साह्याने स्मार्टफोनचा कॅमेरा आणि फ्लॅशच्या माध्यमातून रक्तातली ऑक्सिजन पातळी घरीच मोजता येणार आहे. यासाठी संशोधकांनी प्रूफ-ऑफ थिअरीचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान रक्तातली ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी मोजण्यासाठी एक स्मार्टफोन कॅमेरा आणि फ्लॅश मॉड्यूलचा वापर केला गेला. (हे वाचा:अंधारही आरोग्यासाठी महत्त्वाचा, तर कृत्रिम प्रकाशामुळे वाढतं प्रदूषण, वाचा सविस्तर ) हॉफमन वॉशिंग्टन विद्यापीठातल्या डॉक्टरेटच्या विद्यार्थ्यांनी या संशोधनात सहभाग घेतला. `2020 मध्ये सुरुवातीला अ‍ॅप स्टोअरवर (App Store) अशी काही अ‍ॅप्स उपलब्ध होती, ज्यांच्या साह्याने रक्तातली ऑक्सिजन पातळी तपासणं शक्य होतं; पण तांत्रिक त्रुटींमुळे ती अ‍ॅप्स स्टोअरवरून हटवण्यात आली. अजूनही अशी अ‍ॅप्स उपलब्ध होऊ शकतात; पण कोणत्याही प्रकारच्या उपचारांसाठी या अ‍ॅप्सचा वापर करणं योग्य नाही,` असं संशोधनात सहभागी संशोधकांनी सांगितलं. वॉशिंग्टन विद्यापीठ आणि सॅन दिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांचा प्रूफ ऑफ थिअरी अभ्यास एनपीजे मेडिसीन नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी या तंत्राच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. रक्तातली ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी या संशोधनात सहभागी व्यक्तींच्या बोटावरून गुगल नेक्सस 6P स्मार्टफोनचा कॅमेरा आणि फ्लॅश मॉड्यूलच्या साह्याने डेटा गोळा करण्यात आला. प्राप्त झालेला डेटा रक्तातली ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी डीप-लर्निंग अल्गोरिदम प्रशिक्षित करण्यासाठी वापरला गेला. (हे वाचा:शास्त्रज्ञांनी विकसित केली जांभळ्या टोमॅटोची वैशिष्ट्यपूर्ण जात ) संशोधकांच्या मते, स्मार्टफोनचा कॅमेरा आणि फ्लॅश मॉड्यूल वापरून रक्तातली ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी 70 टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकते. परंतु, यावर अद्याप संशोधन सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर येत्या काळात घरीच रक्तातली ऑक्सिजन पातळी मोजता येणार आहे. यामुळे पैसे आणि वेळ अशा दोन्ही गोष्टींची बचत होणार आहे.
First published:

Tags: Health, Lifestyle, Techonology

पुढील बातम्या