मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एक सेकंद थांबा! ऑनलाईन फोन घेताना तुम्ही तर करत नाही 'या' चूका, नाहीतर Offer पडेल महागात

एक सेकंद थांबा! ऑनलाईन फोन घेताना तुम्ही तर करत नाही 'या' चूका, नाहीतर Offer पडेल महागात

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

फोन घेणे सोपे आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. याची दोन मुख्य कारणे आहेत, त्यामुळे 'या' गोष्टी आधी समजून घ्या

  • Published by:  Devika Shinde
मुंबई 22 सप्टेंबर : फोन ही अशी गोष्ट आहे, जी आजच्या काळात सर्वांसाठीच काळाची गरज बनली आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोक आपल्या कामांसाठी फोनवरती अवलंबून असतात. मनोरंजन, फोन करणं, कॅमेरा, पैसे पाठवणे ही सगळीच कामं आपला एक छोटा फोन करतो. त्यामुळे बहुतांश लोक ते वापरतात. तसेच बरेच लोक यांना विकत घेतात. तसेच लोक कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेण्यासाठी ऑनलाईन ऑफर्सवर अवलंबून असतात. खरंतर फोन विकत घेण्यापूर्वी आपण ऑनलाइन सेलमध्ये मिळणाऱ्या भरघोस सवलतींकडे लक्ष देतो, परंतू स्मार्टफोन खरेदीसाठी काही स्मार्ट टिप्स आवश्यक आहेत, ज्या तुमची फसवणूक होण्यापासून रोखू शकतात. चला याबद्दल जाणून घेऊ. फोन घेणे सोपे आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. याची दोन मुख्य कारणे आहेत, पहिले तंत्रज्ञान आणि दुसरे म्हणजे अनेक पर्याय. त्यामुळे ऑनलाइन सेल फोन खरेदी करण्यापूर्वी या स्मार्ट टिप्स फॉलो करा. स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या प्रकारचा फोन हवा आहे हे समजून घ्या. कारण प्रत्येक वापरकर्त्याच्या वेगवेगळ्या गरजा असतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचा स्मार्टफोन हवा आहे ते समजून घ्या. एक प्रकारे गुंतवणूक म्हणून याचा विचार करा. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण रकमेचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत तुमच्या गरजेनुसार स्मार्टफोन निवडा. हे वाचा : एक नंबर! आता WhatsAppवर पाठवलेले मेसेज करु शकाल Edit! लवकरच येत आहे नवीन फीचर बजेट ऑफरमध्ये फोन उपलब्ध आहे, पण तुमचे बजेट किती आहे. स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमचे बजेट ठरवा. यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आवश्यक असलेला फोन निवडणे सोपे होईल. स्मार्टफोन ब्रँड अनेकदा वापरकर्ते फक्त विशिष्ट ब्रँड पसंत करतात. iPhone किंवा Android हे दोन भिन्न ब्रँड आहेत. अशा स्थितीत फोन खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला मिळणारी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आवृत्ती आहे हे नक्की समजून घ्या. स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी, त्या फोनमध्ये किती रॅम आहे आणि कोणता प्रोसेसर आहे हे समजून घ्या, कारण स्मार्टफोनचा मल्टी-टास्किंगचा वेग आणि स्तर प्रोसेसर आणि रॅमवरच अवलंबून असतो. Snapdragon, Nvidia, Qualcomm, Intel आणि MediaTek सारखे प्रोसेसर वापरकर्त्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. बॅटरी आणि कॅमेरा कोणत्याही वापरकर्त्यासाठी फोनची बॅटरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत, फोन खरेदी करताना, बॅटरीचे आयुष्य किती आहे हे निश्चितपणे जाणून घ्या, जेणेकरून तुम्ही वापरानुसार फोन निवडू शकता. हे वाचा : Smartphone Guidelines: सावधान! स्मार्टफोन युजर्ससाठी केंद्र सरकारची नवी गाईडलाईन, ‘या’ गोष्टी न करण्याचा सल्ला याशिवाय सेल्फीच्या जमान्यात स्मार्टफोनचा कॅमेरा कसा आहे, हेही विशेष आहे. फोन खरेदी करताना रिझोल्यूशन, मागील कॅमेरा, फ्रंट कॅमेरा, एलईडी फ्लॅश, ऑटोफोकस यासह व्हिडीओ रेकॉर्डिंगबद्दल तपशील जाणून घ्या स्क्रीन फोनची स्क्रीन किती मोठी आहे आणि रिझोल्यूशन काय आहे हे खूप महत्वाचे आहे. स्क्रीनबद्दल बोलायचे झाले तर साधारणत: 4-5 इंच स्क्रीन असलेला स्मार्टफोन अधिक चांगला मानला जातो, कारण तो हातात धरून ठेवणेही खूप आरामदायक असते. मात्र, तुम्हाला कोणत्या प्रकारची स्क्रीन हवी आहे हे तुमच्यावर अवलंबून असेल. रेझोल्यूशनबद्दल बोलायचे झाले तर, जर तुम्ही 4.5-5 इंच डिस्प्ले असलेला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर त्याचे रिझोल्यूशन किमान 720 पिक्सेल असावे. 5 इंचांपेक्षा मोठ्या डिस्प्लेसाठी फुल-एचडी रिझोल्यूशन (1020 पिक्सेल) आवश्यक आहे.
First published:

Tags: Marathi news, Money, Online, Online shopping

पुढील बातम्या