• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Facebook भारतात लाँच करणार Vaccine Finder टूल; तुम्हाला असा होणार फायदा

Facebook भारतात लाँच करणार Vaccine Finder टूल; तुम्हाला असा होणार फायदा

फेसबुकने शुक्रवारी भारतात आपल्या मोबाईल अ‍ॅपवर 'वॅक्सिन फाइंडर' (Vaccine Finder) टूल रोल आउट करण्याची घोषणा केली. हे टूल भारत सरकारच्या भागीदारीत विकसित करण्यात आलं आहे. हे टूल 17 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध होईल. या टूल लस मिळवण्यासाठी लोकांना जवळपासची ठिकाणं शोधण्यास मदत करेल.

  • Share this:
    नवी दिल्ली, 2 मे : भारतात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतेच आहे. या कठीण काळात भारताच्या मदतीसाठी अनेक देशांसह मायक्रोसॉफ्ट, गुगल, अ‍ॅपल या कंपन्याही पुढे सरसावल्या आहेत. आता फेसबुकही (Facebook) वॅक्सिनेशनसाठी (Vaccination) भारत सरकारला (Govt of India) मदत करत आहे. फेसबुकने भारत सरकारशी मिळून वॅक्सिनेशनबाबत एक असं टूल तयार केलं आहे, ज्याचा वापर करुन लोक हे जाणून घेऊ शकतात, की त्यांच्या जवळपास कुठे लस, लसीकरण केंद्र उपलब्ध आहे. फेसबुकने शुक्रवारी भारतात आपल्या मोबाईल अ‍ॅपवर 'वॅक्सिन फाइंडर' (Vaccine Finder) टूल रोल आउट करण्याची घोषणा केली. हे टूल भारत सरकारच्या भागीदारीत विकसित करण्यात आलं आहे. हे टूल 17 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध होईल. या टूल लस मिळवण्यासाठी लोकांना जवळपासची ठिकाणं शोधण्यास मदत करेल.

    (वाचा - Truecaller ने लाँच केली कोविड रुग्णालयांची फोन डायरेक्टरी; कठीण काळात होईल मदत)

    वॅक्सिनेशनसाठी अपॉईंटमेंट घेता येईल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या डेटाचा वापर करुन लसीकरण केंद्रांविषयी आणि त्यांचा कालावधी याबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी या टूलचा वापर होईल. या टूलमध्ये वॉक-इन ऑप्शनही मिळेल आणि वॅक्सिनेशनच्या अपॉईंटमेंटसाठी अधिकृत कोविड वॅक्सिन पोर्टल CoWin वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक लिंकही दिली जाईल. हे टूल फेसबुकवर Covid-19 Information Centre मध्ये उपलब्ध आहे.

    (वाचा - Paytmमेच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध करुन देणार 21 हजार Oxygen कंसंट्रेटर्स)

    येथे मिळेल माहिती - सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक भारतातील स्वयंसेवी संस्था आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या एजेन्सींना जाहिरातीचं श्रेय आणि इनसाईटला समर्थन देत आहे, जे फेसबुकवर अनेक लोकांपर्यंत कोविड-19 वॅक्सिन आणि आवश्यक आरोग्यासंबंधी माहिती पुरवत आहेत. तसंच ते युनिसेफ इंडियासोबत लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी काम करत आहेत, जेणेकरुन आपत्कालीन वेळी आणि घरी कोरोनाची हलकी लक्षणं दिसल्यास कशाप्रकारे खबरदारी घ्यावी याबाबत माहिती दिली जाईल. ही माहिती फेसबुकच्या Covid-19 इन्फॉर्मेशन सेंटर आणि याच्या न्यूड फीडमध्ये उपलब्ध आहे. इन्स्टाग्रामवर कंपनी 'Explore' सेक्शनमध्ये 'Guide' च्या माध्यमातून ही माहिती पोहोचवत आहेत.
    Published by:Karishma Bhurke
    First published: