मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Paytm ची मोठी मदत; मेच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध करुन देणार 21 हजार Oxygen कंसंट्रेटर्स

Paytm ची मोठी मदत; मेच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध करुन देणार 21 हजार Oxygen कंसंट्रेटर्स

मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, गुगल या कंपन्यांनंतर आता डिजीटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमनेही (Paytm) मदतीचा हात दिला आहे. Paytm ने 21,000 ऑक्सिजन कंसंट्रेटरसाठी (Oxygen Concentrators) ऑर्डर दिली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 28 एप्रिल : कोरोनाच्या कठीण काळात अनेक कंपन्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. आपली सामाजिक जबाबदारी समजून मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, गुगल या कंपन्यांनंतर आता डिजीटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमनेही (Paytm) मदतीचा हात दिला आहे. Paytm ने 21,000 ऑक्सिजन कंसंट्रेटरसाठी (Oxygen Concentrators) ऑर्डर दिली आहे. हे ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देशात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार आहेत. पेटीएमच्या प्रवक्त्यांनी बुधवारी सांगितलं, की कंपनीने जनतेकडून (Fund Raising) पाच कोटी रुपये जमा केले आहेत. त्यात आणखी पाच कोटी कंपनीने स्वत:चे टाकून 10 कोटी रुपयांचे ऑक्सिजन कंसंट्रेटर खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे.

या ठिकाणी पाठवले जाणार, ऑर्डर केलेले ऑक्सिजन कंसंट्रेटर्स -

ऑक्सिजन कंसंट्रेटर्स हवेने ऑक्सिजनला फिल्टर करतं आणि कमी ऑक्सिजन असणाऱ्या रुग्णांना मदत करतं. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, की पेटीएम फाउंडेशनने (Paytm Foundation) तात्काळ 21,000 ऑक्सिजन कंसंट्रेटर्स आयात करण्याची ऑर्डर दिली आहे. कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा कोविड मदत कार्यात वैद्यकीय कौशल्य असलेल्या समर्पित संघाचं नेतृत्व करत आहेत. हे उपकरण त्वरित सराकारी रुग्णालयं, कोविड केअर सेंटर्स, खासगी रुग्णालयं, नर्सिंग होम आणि रेजिडेंट वेलफेयर असोसिएशनला पाठवले जातील.

(वाचा - Truecaller ने लाँच केली कोविड रुग्णालयांची फोन डायरेक्टरी; कठीण काळात होईल मदत)

ऑक्सिजन मागवण्यासाठी स्टार्ट-अप्सकडूनही मदत -

पेटीएम फाउंडेशन आंतरराष्ट्रीय बाजारातून ऑक्सिजन कंसंट्रेटर मिळवण्यासाठी इतर स्टार्ट-अप्स, युनिट्स, संस्था आणि उद्योजकांना पाठबळ देत आहेत. Paytm प्रवक्त्यांनी, पेटीएम फाउंडेशन या परिस्थितीत त्वरित दिलासा देण्यासाठी 21000 ऑक्सिजन कंसंट्रेटर आयात करण्याची ऑर्डर देण्यात आली असून कोविड रुग्णांना दिलासा देण्यासाठी हे देशभरात वापरले जातील, अशी माहिती दिली.

First published:

Tags: Coronavirus, Paytm, Tech news