मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Truecaller ने लाँच केली कोविड रुग्णालयांची फोन डायरेक्टरी; कठीण काळात होईल मोठी मदत

Truecaller ने लाँच केली कोविड रुग्णालयांची फोन डायरेक्टरी; कठीण काळात होईल मोठी मदत

 टेलिफोन सर्च इंजिन आणि कॉलर आयडी सर्विस प्रोव्हायडर ट्रू कॉलरने (Truecaller) कोविड रुग्णालयांची (Covid Hospitals) एक फोन डायरेक्टरी (Phone Directory) सुरू केली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 28 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती (Corona Crisis) निर्माण झाली आहे. रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर, बेडची मोठी कमतरता भासत आहे. अनेकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या कठीण काळात देशातील अनेक बड्या कंपन्या, सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिकही जमेल तशी मदत करण्यास पुढे सरसावले आहेत. आता टेलिफोन सर्च इंजिन आणि कॉलर आयडी सर्विस प्रोव्हायडर ट्रू कॉलरने (Truecaller) कोविड रुग्णालयांची (Covid Hospitals) एक फोन डायरेक्टरी (Phone Directory) सुरू केली आहे.

सरकारी डेटाबेसमधून घेण्यात आले रुग्णालयांचे फोन नंबर्स -

ट्रूकॉलर, युजर्सला या फोन डायरेक्टरीमधून आपल्या भागातील कोविड रुग्णालयं आणि इतर सुविधा शोधण्यासाठी मदत मिळू शकते. कंपनीने सांगितलं की, डायरेक्टरी अ‍ॅपमध्ये बनवण्यात आलं आहे. यामुळे युजर्स मेन्यु किंवा डायलरद्वारे सहजपणे एक्सेस करू शकतात. ट्रूकॉलरने दिलेल्या माहितीनुसार, कोविड रुग्णालयांच्या या फोन डायरेक्टरीमध्ये देशभरातील अनेक राज्यांच्या रुग्णालयांचे फोन नंबर आणि पत्ते सामिल आहे. हे नंबर्स आणि पत्ते सरकारी अधिकृत डेटाबेसमधून घेण्यात आले आहेत. अधिकृत सरकारी डेटाबेसमधून घेतल्याने हे वेरिफाईड मानले जात आहेत.

(वाचा - रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या काही मिनिटांतच CoWIN सर्व्हर क्रॅश)

रुग्णालयात बेड आहे की नाही याची माहिती मिळणार नाही -

टेलिफोन सर्च इंजिनने सांगितलं की, या फीचरच्या मदतीने युजर्सला एका सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर आवश्यक माहिती मिळू शकते. परंतु यात रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, की नाही हे दाखवलं जाणार नाही. हे अ‍ॅप दररोज अपडेट करत असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. या सुविधाचा वापर करण्यासाठी गुगल प्ले स्टोरवर ट्रूकॉलर अपडेट करावं लागेल. अद्याप ही सुविधा केवळ अँड्रॉईड (Android) युजर्ससाठी उपलब्ध आहे.

First published:

Tags: Coronavirus, Tech news