जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमच्या Smartphone सोबत तुम्ही नकळत 100 हून अधिक वेळा करता ही एक गोष्ट; तुम्हाला माहिती आहे का?

तुमच्या Smartphone सोबत तुम्ही नकळत 100 हून अधिक वेळा करता ही एक गोष्ट; तुम्हाला माहिती आहे का?

तुमच्या Smartphone सोबत तुम्ही नकळत 100 हून अधिक वेळा करता ही एक गोष्ट; तुम्हाला माहिती आहे का?

स्मार्टफोन, इंटरनेट, गुगल, यूट्यूबबाबतच्या या आश्चर्यचकित करणाऱ्या बाबी माहित आहेत का?

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : आजच्या इंटरनेटच्या डिजीटल जगात प्रत्येक जण टेक्नोलॉजीचा वापर करतो आहे. मनोरंजनापासून ते शाळा, कॉलेज आणि ऑफिसपर्यंतची सर्वच कामं टेक्नोलॉजी-इंटरनेटचा वापर करून केली जातात. सकाळी उठल्यापासून प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो. जगभरात असे अनेक लोक आहेत, जे अगदी टॉयलेटमध्येही स्मार्टफोन घेऊन जातात. स्मार्टफोनबाबतच्या अशाच काही आश्चर्यचकित करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. - जपानमध्ये मिळणारे जवळपास 90 टक्के स्मार्टफोन्स वॉटरप्रूफ असतात. कारण येथील तरुण वर्ग अंघोळीवेळी, शॉवरमध्येही स्मार्टफोनचा वापर करते. जपानमधील अनेक लोक टॉयलेट-बाथरुममध्येही स्मार्टफोनचा वापर करतात. - प्रत्येक समस्येचं उत्तर Google वर आहे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर Google Search Engine वर मिळतं. पण गुगलबदद्लची ही एक बाब तुम्हाला माहितेय का? Google वर जगभरात एका सेकंदात तब्बत 63 हजार आणि एका दिवसात 5.6 बिलियन सर्चेच केले जातात. - आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रिनवर टॉयलेट सीटहून अधिक बॅक्टेरिया असतात. एका टॉयलेट सीटच्या तुलनेत फोनवर 18 पट अधिक बॅक्टेरिया असतात.

टॉयलेट सीटपेक्षाही खराब आहे तुमची Smartphone Screen, गंभीर आजारांचा धोका

- जगभरात YouTube अतिशय पॉप्युलर व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे. इथे जितके लोक व्हिडीओ पाहतात. जवळपास तितकेच लोक व्हिडीओ अपलोडही करतात. YouTube वर दर मिनिटाला 500 तासांच्या व्हिडीओ अपलोड होत असतात. - सध्याच्या काळात असा चुकूनच एखादा व्यक्ती असेल, जो स्मार्टफोनचा वापर करत नाही. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच फोनची सवय आहे. एका रिसर्चनुसार, एक व्यक्ती दर दिवसाला 110 हून अधिक वेळा आपल्या स्मार्टफोन अनलॉक करतो. - डिजीटल जगात एकीकडे अनेक गोष्टी फास्ट, सुविधाजनक होत असताना, दुसरीकडे Hacking ही अतिशय मोठी समस्या वाढते आहे. यावर अद्यापही कायमस्वरुपी उपाय नाही. जगभरात दररोज 30 हजारहून अधिक वेबसाइट्स हॅक होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात