जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Smartphone बाबत धक्कादायक खुलासा, टॉयलेट सीटपेक्षाही खराब आहे तुमची Phone Screen; गंभीर आजारांचा धोका

Smartphone बाबत धक्कादायक खुलासा, टॉयलेट सीटपेक्षाही खराब आहे तुमची Phone Screen; गंभीर आजारांचा धोका

Smartphone बाबत धक्कादायक खुलासा, टॉयलेट सीटपेक्षाही खराब आहे तुमची Phone Screen; गंभीर आजारांचा धोका

आपण कुठेही असलो, कोणत्याही वस्तूला हात लावला तरी त्यानंतर कोणताही विचार न करता तेच हात स्मार्टफोनला लावतो. त्यामुळे फोनच्या स्क्रिनवर अनेक जीव-जंतू सेटल होतात आणि त्यानंतर आपल्याला गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : सध्याच्या या डिजीटल, इंटरनेटच्या जगात चुकूनच एखादा असा व्यक्ती असेल ज्याच्याकडे Smartphone नसेल. जवळपास प्रत्येक जण प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी स्मार्टफोनचा वापर करतो. आपण कुठेही असलो, कोणत्याही वस्तूला हात लावला तरी त्यानंतर कोणताही विचार न करता तेच हात स्मार्टफोनला लावतो. त्यामुळे फोनच्या स्क्रिनवर अनेक जीव-जंतू सेटल होतात आणि त्यानंतर आपल्याला गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार, आपल्या स्मार्टफोनवर एका टॉयलेट सीटहून 10 पट अधिक जीव-जंतू असतात. त्यामुळे स्मार्टफोन युजर्सला गंभीर आजार उद्धवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यामागे दोन कारण सांगितली गेली आहेत. - एका अभ्यासानुसार, एक व्यक्ती जवळपास 80 वेळा आपल्या फोनला हात लावतो आणि त्यामुळे स्क्रिनवर जीव-जंतू जमा होतात. अनेक जण अनेक खराब, घाणेरड्या ठिकाणी हात लावून तेच हात नंतर स्मार्टफोनला लावतात त्यामुळेच जीव-जंतू आणि आजारांचा धोका निर्माण होतो. - त्याशिवाय फोन हीट होणं हेदेखील स्क्रिनवर जीव-जंतू निर्माण होण्याचं दुसरं कारण सांगितलं गेलं आहे. फोनमधून निर्माण होणाऱ्या हीटमुळे जीव-जंतू वेगाने वाढतात आणि पसरतात. पण सर्वसामान्यपणे फोन हीट-अप होण्यापासून आपण थांबवू शकत नाही. मात्र फोन स्वस्छ ठेवणं हे प्रत्येकाच्या हातात आहे.

बापरे! गेम खेळताना मोबाईलचा ब्लास्ट; चिमुकल्यांच्या शरीरात घुसले बॅटरीचे तुकडे

आपल्या स्मार्टफोनवर अनेक प्रकारचे जीव-जंतू असले, तरी हे सर्वच धोकादायक नसतात. फोनवर एक E.coli बॅक्टेरिया असतो, ज्यामुळे डायरिया आणि फूड पॉयजनिंग सारखे आजार होऊ शकतात. त्याशिवाय काही बॅक्टेरियामुळे स्किन इन्फेक्शनही होऊ शकतं.

स्वस्तातला मोह पडला महागात..! फोनच्या जागी असं काही आलं की..कधीच नाही विसरणार

अशा इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी फोन स्वस्छ ठेवणं, डिसइन्फेक्ट करणं गरजेचं आहे. फोनला हात लावण्याआधी हात धुणं, स्वस्छ करणं आवश्यक आहे. कोणालाही तुमच्या फोनला हात लावू देऊ नका. तसंच टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाऊ नका. अशा छोट्या-छोट्या परंतु अतिशय फायदेशीर गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्ही स्मार्टफोनवरील धोकादायक बॅक्टेरिया आणि त्यापासून होणाऱ्या आजारांपासून स्वत:चा बचाव करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात