मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुम्हीही Toilet मध्ये Smartphone घेवून जाता का? मग याचे गंभीर परिणाम एकदा वाचाच

तुम्हीही Toilet मध्ये Smartphone घेवून जाता का? मग याचे गंभीर परिणाम एकदा वाचाच

टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं हे तुमच्या आरोग्यासाठी (Health) धोकादायक ठरू शकतं. टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाण्याची वाईट सवय तुम्ही जर वेळीच बदलली नाही, तर विविध आजारांना तुम्ही आमंत्रण देत रहाल.

टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं हे तुमच्या आरोग्यासाठी (Health) धोकादायक ठरू शकतं. टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाण्याची वाईट सवय तुम्ही जर वेळीच बदलली नाही, तर विविध आजारांना तुम्ही आमंत्रण देत रहाल.

टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं हे तुमच्या आरोग्यासाठी (Health) धोकादायक ठरू शकतं. टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाण्याची वाईट सवय तुम्ही जर वेळीच बदलली नाही, तर विविध आजारांना तुम्ही आमंत्रण देत रहाल.

    नवी दिल्ली, 7 डिसेंबर : तुम्ही टॉयलेटमध्ये (Toilet) मोबाइल फोन (Mobile phone) घेऊन जाता का? या प्रश्नाचे उत्तर 'हो' असेल तर आजच ही सवय बदला. कारण टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं हे तुमच्या आरोग्यासाठी (Health) धोकादायक ठरू शकतं. टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाण्याची वाईट सवय तुम्ही जर वेळीच बदलली नाही, तर विविध आजारांना तुम्ही आमंत्रण देत रहाल.

    स्मार्टफोन (Smartphone) ही आता लोकांची महत्त्वाची गरज बनली आहे. अनेकजण तर झोपण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत स्मार्टफोनचा वापर करतात आणि सकाळी उठल्यावर आधी फोन हातात घेतात. अनेकांना स्मार्टफोनचं इतके व्यसन लागलं आहे की, ते टॉयलेटमध्ये सुद्धा स्मार्टफोन घेऊन जातात. हे लोक जेवढा वेळ टॉयलेटला जातात, तेवढा वेळ फोन चालू ठेवतात. तुम्हालाही कदाचित अशी सवय असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, टॉयलेटमध्ये फोन वापरणं किती धोकादायक ठरू शकतं? त्यामुळे तुम्हाला कोणतं नुकसान होऊ शकतं?

    टॉयलेट मध्ये फोन नेल्यास तुम्ही त्यामध्ये व्यस्त राहता. पण टेक्नॉलॉजीपासून थोडासा ब्रेक घेण्यासाठी टॉयलेट हे एक चांगलं ठिकाण आहे. त्यामुळे टॉयलेटमध्ये फोन नेऊ नका. टॉयलेटमध्ये फोन न नेणं, हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. कारण टॉयलेटमध्ये फोन न नेल्याने तुम्ही फोनमध्ये व्यस्त राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे तुमच्या मनाला विश्रांती मिळते. तुमच्या शरीराचा मानसिक ताण कमी होतो आणि तुम्ही टॉयलेटमध्ये खूप विचार करू शकता.

    कीटकनाशके वापरलेले अन्न खाणे यासाठी आहे घातक; आरोग्यावर होतात असे परिणाम

    टॉयलेटमध्ये फोन वापरण्याचे अनेक तोटे आहेत. विविध कारणांमुळे टॉयलेटमध्ये फोन वापरणं हानिकारक ठरू शकतं. टॉयलेटमध्ये फोन वापरण्याचा पहिला तोटा म्हणजे टॉयलेट ही अशी जागा आहे जिथे धोकादायक जंतू नेहमीच असतात. टॉयलेट सीट, नळ, फ्लश बटण इत्यादींवर बॅक्टेरिया असतात. जेव्हा तुम्ही फोनचा वापर करता तेव्हा बॅक्टेरिया फोनच्या स्क्रीनवर देखील येऊ शकतो. तुम्ही टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर हातासारखा फोन धुवू शकत नाही. त्यामुळे बॅक्टेरिया फोनवर राहतात आणि नंतर हाताद्वारे शरीरात जातात, जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

    या लक्षणांवरून समजेल तुम्हाला मुतखडा आहे का? हे घरगुती उपाय ठरतील गुणकारी

    टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने शरीरात सुद्धा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अमेरिकेतील 90 टक्के नागरिक टॉयलेटमध्येही मोबाइल फोन वापरतात, असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. सर्वेक्षणानुसार, 90 पैकी 53 टक्के लोक असे आहेत की, ते पाय सुन्न होईपर्यंत टॉयलेटमध्ये फोन वापरतात. म्हणजेच, जेव्हा तुम्ही फोन घेऊन टॉयलेटमध्ये जाता तेव्हा तुमचा बराच वेळ जातो. यामुळे, तुम्ही गुदद्वारावर (Rectum) अनावश्यक ताण टाकता, आणि नंतर ते मूळव्याधीसारख्या आजाराचं कारण बनतं. त्यामुळे फोन घेऊन टॉयलेटमध्ये जाऊ नका.

    हृदयविकाराचा झटका आणि छातीत होणारी जळजळ यात काय फरक असतो? अशी ओळखा लक्षणे

    तुम्हाला देखील टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाण्याची सवय असेल, तर ही सवय आरोग्यास नुकसानकारक ठरू नये, यासाठी लगेच बदलण्याची गरज आहे. टॉयलेटमध्ये जात असताना फोन बाहेरच ठेवणं उत्तम पर्याय आहे.

    First published:

    Tags: Health Tips, Smartphone, Tech news